४ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
आमच्यापैकी काही आपलपोटी मंडळी अयोग्य पुढारी नेमून देऊन अज्ञानी लोकांना फसवितात. पशूपक्षी देखील आपल्याच जातीचा पुढारी करितात, पक्ष्यात कधी चतुष्पादाचा पुढारी झाला नाही. चतुष्पादी कधीही पक्ष्यांचा पुढारी नसतो. गाय, बैल, मेंढरे यात मात्र धनगर त्यांचा पुढारी असतो त्यामुळे शेवटी त्यांना कसाबखान्यात जावे लागते !
आज त्यांना पंडित ही पदवी देण्यास तरी काय हरकत आहे ? विद्वानात ते एक भूषणच आहेत. आर्यसमाज, बुद्धसमाज व खिस्ती यांनी त्यांना आपल्यात आनंदाने घेतले असते. परंतु ते तुमचा उद्धार करण्याकरिता तिकडे गेले नाहीत. याबद्दल तुम्ही त्यांचे आभार मानिले पाहिजेत व मीही मानतो.” *
““माझ्या राज्यातील बहिष्कृत प्रजाजनांनो, तुम्ही तुमचा खरा पुढारी शोधून काढला ह्याबद्दल मी तुमचे अंतःकरणपूर्वक अभिनंदन करतो. माझी खात्री आहे की, डॉ. आंबेडकर हे तुमचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाहीत, इतकेच नव्हे तर अशी एकवेळ येईल की, ते सर्व हिंदुस्थानचे पुढारी होतील, अशी माझी मनोदेवता मला सांगते “.२
“नंतर खालील ठराव सभेत सर्वानुमते पास झाले.
(१) महायुद्धात ब्रिटिश सरकारला व दोस्त राष्ट्रांना जय मिळाल्याबद्दल ही परिषद आनंद व्यक्त करीत आहे.
(२) श्रीमन्महाराज शाहू छत्रपती सरकार इलाखा करवीर यांनी आपल्या राज्यात बहिष्कृतांना समानतेचे हक्क देऊन त्यांचा उद्धार करण्याचे सत्कृत्य आरंभिले आहे याबद्दल त्यांचा वाढदिवस प्रत्येक बहिष्कृत व्यक्तीने सणाप्रमाणे साजरा करावा असे या परिषदेचे मत आहे.
(३) जे राजे, महाराजे व संस्थानिक बहिष्कृतांच्या उन्नतीसाठी प्रयत्न करीत आहेत त्यांचे ही परिषद मन:पूर्वक आभार मानिते. |
(४) दरेक व्यक्तीच्या उन्नतीला सानुकूल सामाजिक परिस्थितीची अत्यंत जरूरी आहे. जन्मसिद्ध अयोग्यता व जन्मसिद्ध अपवित्रता यामुळे हिंदुस्थानातील सामाजिक परिस्थिती बहिष्कृत वर्गाच्या उन्नतीस प्रतिकूल आहे. इतकेच नव्हे तर त्यामुळे हा वर्ग सर्वसाधारण अशा मानवी हक्कासदेखील दुरावला आहे. बहिष्कृत लोक हे हिंदी साम्राज्याचे घटक आहेत व इतर हिंदी लोकांप्रमाणे त्यांना खालील मानवी हक्क आहेत;
(अ) सार्वजनिक रस्ते, विहिरी, तलाव, शाळा, धर्मशाळा तसेच लायसेन्सखाली
असलेल्या करमणुकीच्या जागा, भोजनगृहे, वाहने इत्यादि सार्वजनिक सोयींचा
उपभोग घेण्याचा त्यांना हक्क आहे. |
१ मूकनायक : १० एप्रिल १९२०.
* डॉ. बाबासाहेब आंबेडकर : धनंजय कीर, पृष्ठ ४६.