४१० डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
दृष्टी आहे पण ते चूक आहे. सायमन कमिशनला रिपोर्ट सादर करताना हे दिसून आले आहे. त्यावेळी राष्ट्रीय विचारांच्या पुष्कळ लोकांनीही त्यांची स्तुती केली. डॉ. आंबेडकरांचा स्वभाव फारच निगर्वी आहे. जे. पी. पदवी सरकार त्यांना देऊ लागले त्यावेळेस ते ती घेईनात. डॉ. आंबेडकर फार निस्पृही आहेत. याची साक्ष त्यांची राऊंड टेबल मधील भाषणे देतील. त्यांच्यासारखा मुंबई कौन्सिलात स्पष्टवक्ता सापडणार नाही. आपल्या समाजाच्या हितासाठी ते कोणाचीही पर्वा करीत नाहीत. त्यांना तिन्ही राऊंड टेबल परिषदांना व आताच्या जॉईट पार्लमेंटरी कमिटीलाही प्रयत्न न करता बोलाविले यावरून त्यांची लायकी दिसून येते. आताही ते आपली कामगिरी योग्यतन्हेने बजावतील याबद्दल शंका नाही.
नंतर रा. पी: एल. लोखंडे यांनी नाशिक जिल्ह्यातफेचे मानपत्र वाचून दाखविले व रौप्य करंडकातून अध्यक्षांच्या हस्ते ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यास अर्पण करण्यात आले. ५०१ रुपयांची थैलीही नाशिक जिल्ह्यातफे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांस अर्पण करण्यात आली. त्यानंतर रा. हरिभाऊ हनुमंत रोकडे यांनी पुणे जिल्ह्यातफ मानपत्र वाचून दाखविले व अध्यक्षांच्या हस्ते सोनेरी फ्रेमीतून एक अशा सोनेरी अक्षरांनी लिहिलेल्या मानपत्राच्या दोन प्रती डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांस अर्पण करण्यात आल्या.
पुणे जिल्ह्यातफ थैली अर्पण करताना रा. शांताराम अनाजी उपशाम हे म्हणाले की, यापूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्यास मदत म्हणून ३५० रुपयांची टाईप रायटींग मशीन पुणे जिल्ह्यातफे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांस अर्पण करण्यात आली आहे व आज ही २०० रुपयांची थैली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांस अर्पण करण्यात येत आहे असे म्हणून त्यांनी ती अध्यक्षांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांस अर्पण केली. नंतर नायगाव चाळीतील रहिवाशांतफंची ९१ रुपयांची थैली अर्पण करण्यास रा. विठ्ठल तानाजी साकरे उभे राहिले. ते म्हणाले, वेळेच्या अभावी आम्हाला जास्त कार्यक्रम करता आला नाही. आमच्या या अल्पशा थेलीचा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्वीकार करावा अशी विनंती आहे, असे म्हणून त्यांनी ९१ रुपयांची थैली अध्यक्षांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांस अर्पण केली. त्यानंतर ट्राम कंपनीची चाळ चवथा माळा (परळ) येथील पंच मंडळीतफ डॉ. आंबेडकरांस ५० रुपयांची थैली रा. चांगू बहेरू गाडे यांनी अर्पण केली व भोर संस्थानच्या काही मंडळींनी १७ रुपयांची देगणी दिली.
नंतर समता सैनिक दलातफं हार अर्पण करण्यास रा. साळवी हे उभे राहिले. हार अर्पण करताना ते म्हणाले की, समता सैनिक दलाच्या सैनिकांचा पलटणीत प्रवेश होईल असा प्रयत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर करतील अशी मला