या देशात इंग्रज सरकार काहीच करीत नाही ४१३
घर मालकाला ग्रँट देऊन ' त्याजजवळून भाडे जास्त घेणार नाही ' अशी अट लिहून घेते.
तिकडे सर्वत्र प्राथमिक शिक्षण सक्तीचे आहे व ते फुकट देण्यात येते. एवढेच नव्हे तर दुय्यम व कॉलेजचे शिक्षणही तिकडे फुकटच देण्यात येते. तेच इंग्रज सरकार या देशात काही करीत नाही.
मुंबईत लवकरच एक प्रसंग ओढविण्याचा संभव आहे. येथील गिरणीचे मालक कामगारांना अडवून त्यांचे पगार कमी करीत आहेत व त्यामुळे संप होऊन गिरण्या बंद होत आहेत. परंतु येथचे सरकार इकडे लक्ष पुरवित नाही. इंग्लंड, जर्मनी वगैरे देशात अशी परिस्थिती उत्पन्न झाली असती तर तेथचे सरकार असे थंड बसले नसते.
शांतता ठेवण्यापलीकडे आपले कर्तव्य नाही, असे येथले सरकार समजत असेल तर त्यामुळे येथल्या प्रजेला सुख, स्वास्थ्य मिळणे शक्य नाही. राष्ट्राकरिताच नव्हे तर तुमच्यासाठीसुद्धा व्यापक स्वरुपाची सत्ता येथल्या लोकांच्या हाती येणे जरूर आहे. म्हणून इंग्रज सरकारच्या हातून सत्ता काढून घेण्याचा प्रयत्न मी करणार आहे. आता मला दिल्या गेलेल्या एका मानपत्रात असा उल्लेख आहे की, ' सुदाम्याच्या पोह्याप्रमाणे आमच्या अल्पशा थैलीचा स्वीकार करावा. '
त्याबद्दल मला सांगावयाचे आहे की, सुदाम्याच्या पोह्यांनी काही होणार नाही. स्वर्गात तुम्हाला चांगली स्थिती प्राप्त होण्यासाठी माझे प्रयत्न नाहीत व ते माझे कामही नाही. या लोकीचेच तुमचे क्लेश कमी व्हावेत व तुम्हाला सुख पराप्त व्हावे, असे माझे प्रयत्न आहेत व त्यासाठी कलदार पैसा पाहिजे आहे. तो मी तुमच्या जवळून घेणार आहे व तुम्ही तो मला दिला पाहिजे. |