बुद्धीचा उपयोग भाकर, शिक्षण . . . . मिळविण्यासाठी हवा ४१५
दिले होते तेच महात्माजी शीख व मुसलमानांना कोऱ्या कागदावर सही करून देण्यास तयार झाले व अस्पृश्यांना सुईच्या अग्रावर राहील इतका हक्कसुद्धा देण्यास आपण तयार नाही, असे म्हणाले. महात्मा गांधींच्या या प्रतिज्ञेमुळे आपल्या समाजाच्या हितासाठी मला अल्पसंख्यांकांच्या गोटात शिरावे लागले. महात्माजींचे म्हणणे असे होते BI,” अस्पृश्य व स्पृश्य वर्गाचा मीच प्रतिनिधी असून त्यांचे हिताहित कशात आहे, हे मला चांगले समजते. डॉ. आंबेडकर यांच्यामागे अस्पृश्य समाज मुळीच नसून त्यांनी तयार केलेली योजना व मते ही त्यांची स्वतःची आहेत. त्यांचा अस्पृश्य वर्गाशी मुळीच संबंध नाही. “ त्यांच्या या बोलण्यास त्यावेळी हिंदुस्थानात मोठा आधार मिळत होता. काँग्रेस व हिंदू महासभा यांच्या कार्यकर्त्यांकडून अस्पृश्यात फूट पाडण्याचे सारखे प्रयत्न चालू होते व त्याप्रमाणे चांभार समाजातील काही पोटजाती त्यावेळी माझ्या विरुद्ध गेल्या. त्यावेळी खोट्या सभा, खोट्या तारा वगैरेंचा नुसता वर्षाव चालू होता. त्याचवेळी इतर चांभार जातींकडून होत असलेला विरोध ही चूक आहे, हे श्री. वनमाळी व चांदोरकर यांच्या लक्षात आले. मला विरोध करण्यात चांभार समाजाचे हित नाही, हे पूर्णपणे ओळखून माझ्या मागण्यास पाठिंबा देणाऱ्या ज्या अनेक तारा आल्या त्यात चेवली चांभार समाजातर्फे श्री. वनमाळी, चांदोरकर यांचीही एक तार होती, हे मी कधीच विसरणार नाही.
दुसऱ्या राऊंड टेबल कॉन्फरन्सनंतर अल्पसंख्यांकांचा निर्णय सरकारकडून लवकरच प्रसिद्ध करण्यात आला. ` त्यात अस्पृश्यांना स्वतंत्र मतदार संघ देऊन स्वराज्यात अस्पृश्यांचे. स्वातंत्र्य मान्य करण्यात आले होते. सरकारी निर्णय प्रसिद्ध झाल्यावर प्रतिज्ञेप्रमाणे म. गांधींना प्राणान्त प्रायोपवेशन सुरू करावे लागले व त्यातच पूना-करार जन्माला आला. त्या कराराने आपणाला जे राजकीय महत्त्व व हक्क प्राप्त झाले आहेत त्यांचे पालन करणे हे आता तुमच्या हाती आहे. आपल्या जातीचे पुढारी सांगतील तसे ऐकणे व वागणे हा हिंदू धर्मियांचा गुण आहे, त्याप्रमाणे तुम्ही आपल्या जातीच्या पुढान्यांवर विश्वास ठेवा. मला असे वाटत नाही की, हिंदू लोक व त्यांचे पुढारी व तरुण मंडळी तुमच्यासाठी काहीतरी करतील. तुम्हाला देवळात घेऊन जातील, तुम्हाला आपल्या तळ्या-विहिरीचे पाणी पाजतील ही आशा फोल आहे. जे लोक सनातन्यांची मर्जी सांभाळून अस्पृश्यता निवारण करीत आहेत त्यांनी हिंदुस्थानच्या भूगोल व नकाशाकडे अजून दृष्टी लावली नाही. ते थोडे निरीक्षण करतील तर