जन्मसिद्ध श्रेष्ठतेमुळे . . .. .. . कल्याण झाले आहे ५
(ब) गुणसिद्ध योग्यतेने त्यांना व्यापार करण्याचा व नोकरी मिळविण्याचा
हक्क आहे. |
वरील हक्क उपभोगिताना जेव्हा म्हणून अडचण पडेल त्यावेळी ती दूर
करण्यास सरकारने कायद्याने मदत करावी असे या परिषदेचे मत आहे.
(५) प्राथमिक शिक्षण मुलामुलींचा भेद न करिता जितक्या लवकर होईल तितक्या लवकर सक्तीचे व मोफत करण्यात यावे.
(६) बहिष्कृत वर्गात शिक्षणाचा प्रसार होणे अत्यंत जरूरीचे आहे. त्याशिवाय त्यांची उन्नती होणार नाही.
म्हणून त्यांच्यात शिक्षणाचा प्रसार करण्यास शाळा मास्तर, डेप्युटी असिस्टंट, डेप्युटी एज्युकेशनल इन्स्पेक्टर त्यांचे हितेच्छू असले पाहिजेत. ज्याअर्थी, इतर वर्गातील माणसे बहिष्कृत वर्गाच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष किंबहुना अनुदारपणाही दाखवितात त्याअर्थी, वरील प्रकारचे अधिकाऱ्यात बहिष्कृत वर्गातील माणसे असावीत असे या परिषदेचे मत आहे. तसेच बहिष्कृत वर्गाचे मास्तर ट्रेंड होण्यास त्यांना विशेष सवलत देऊन त्यांचा प्रवेश होण्याची सोय सरकारने करावी अशी या परिषदेची आग्रहाची विनंती आहे. बहिष्कृत वर्गात शिक्षणाचा प्रसार करण्यास दरेक जिल्हयाला बहिष्कृत वर्गपैकी निदान एक डेप्युटी किंवा असिस्टंट डेप्युटी एज्युकेशनल इन्स्पेक्टर असावा व त्या दर्जाला ट्रेनिग कॉलेजची थर्ड इयर परीक्षा पास झालेला किंवा मॅट्रीक पर्यंत शिकलेला इसम लायक समजला जावा, असे या परिषदेचे मत आहे.
(७) खालसातील ज्याप्रमाणे मुसलमानांना व म्हैसूर संस्थानातील ब्राह्मणेतर व बहिष्कृत वर्गाच्या विद्यार्थ्यांना मध्यम व वरिष्ठ शिक्षणार्थं मुबलक शिष्यवृत्त्या दिल्या जाल आहेत त्याचप्रमाणे बहिष्कृत वर्गातील विद्यार्थ्यांना ब्रिटिश हद्दीत तशाच शिष्यवृत्त्या मिळाव्या अशी या परिषदेची आग्रहाची विनंती आहे.
(८) सर्वत्र स्पृश्य व अस्पृश्यांच्या शाळा एकत्र असाव्या असे या परिषदेचे मत | आहे.
(९) हल्ली दिसून येत असलेली महारकी वतनदारांची स्थिती अगदी हलाखीची आहे असे कष्टाने म्हणावे लागते. या हलाखीची कारणे दोन असावी असे या परिषदेस वाटते.
(१) महार वतनदारांना पड वगैरे अगदी गलिच्छ कामे करावी लागत
असल्यामुळे त्यांच्या वतनदारीवर कमीपणाची छटा उमटली आहे.
(२) वतनी जमीन वतनदारात पिढ्यानुपिढ्या विभागून जात असल्यामुळे
जमिनीचे इतके बारीक तुकडे झालेले आहेत की, दरेक महार वतनदारास