२१-३-१९२० जन्मसिद्ध श्रेष्ठतेमुळे व पवित्रतेमुळे गुणहीन ब्राह्मणांचे देखील कल्याण झाले आहे. - Page 48

६ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

पुरेशी पैदास होत नसल्यामुळे त्याची अगदी कंगाल स्थिती झाली आहे. यामुळे

वतन पद्धतीत फेरफार करणे अगदी जरूर झाले आहे असे या परिषदेचे ठाम

मत आहे. महारकी वतन सर्व महार लोकात विभागून सर्वांनी दरिद्री व कंगाल

राहण्यापेक्षा ते वतन थोडक्याच लोकात विभागून त्यांची स्थिती मानास्पद व

सुखावह करणे बरे, म्हणून महारकी वतनाची जमीन थोड्याच महारांना मोठ्या

प्रमाणावर वाटून देऊन ज्या महारांना अशा प्रमाणावर जमीन विभागल्यामुळे.

वतनी जमिनीस मुकावे लागेल त्यांना शक्‍य तेथे पड जमीन रयताव्याच्या

नियमाने देऊन त्यांची सोय लावण्यात यावी. हल्ली असलेली वतनी जमीन

ज्या महार HAM देण्यात येईल, त्याच्याकडून आपल्या मुलामुलीस साक्षर

करून आपल्या दर्जाप्रमाणे राहण्याची अट लिहून घेण्यात यावी.

(१०) मेलेल्या जनावराचे मांस कोणत्याही जातीच्या माणसाने खाणे हा गुन्हा आहे, असे कायद्याने मानले जावे असा या सभेचा अभिप्राय आहे. .

(११) तलाठ्याच्या जागांवर बहिष्कृत वर्गाच्या नेमणुका होत जाव्यात, अशी या परिषदेची मागणी आहे.

(१२) बहिष्कृत वर्गाच्या उन्नती करिता झटत असणाऱ्या बहिष्कृतेतर संस्थांचे अगर व्यक्तींचे कळकळीबद्दल ही परिषद जरी आभारी आहे तरीपण बहिष्कृत वर्गाचा राजकीय किवा सामाजिक हितसंचय करण्यास त्यांच्याकडून जे उपाय सुचविले जातात ते उपाय या बहिष्कृत वर्गास सर्वस्वी मान्य होतात असे सरकारने समजू नये असे या परिषदेचे आग्रहाचे सांगणे आहे.

(१३) भावी कायदे कौन्सिलात बहिष्कृतांचे प्रतिनिधी त्यांच्या लोकसंख्येच्या व गरजेच्या प्रमाणात त्यांच्या स्वतंत्र मतदार संघातून निवडून घेण्यात यावेत अशी या परिषदेची हक्काची मागणी आहे.

(१४) ही परिषद भरवून आणण्याचे कामी ज्यांनी परिश्रम केले त्यांचे व विशेषत: आप्पा दादगौडा पाटील यांचे ही परिषद फारफार आभार मानिते.

(१५) वरील सर्व ठराव त्या त्या अधिकाऱ्यांकडे व इतर संबंध असणाऱ्या गृहरथांकडे पाठविण्याचा अधिकार ही परिषद तिच्या अध्यक्षास देत आहे “. *

१ मूकनायक : १० एप्रिल १९२०.