२९-९-१९३४ गुलाम म्हणून अपमान किती दिवस सहन करणार ? - Page 470

४२६ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

करण्यात येईल. या धमकीने अर्थातच ते sages झाले व त्यांचे खरे हृद्‌गत कमिटीच्या दप्तरात मला नमूद करून घेता आले नाही. तेव्हा ज्या लोकांपासून आपणास आपले हिरावले हक्क परत मिळवावयाचे आहेत त्यांच्या मदतीची अपेक्षा करणे धोक्याचे आहे, हे तुम्हास कळून येईल.

शेवटी एक महत्त्वाची गोष्ट तुम्हास मला सांगावयाची आहे. महात्मा गांधींपाशी अस्पृश्यता निवारणाबद्दल ज्यावेळेस माझे बोलणे झाले त्यावेळेस त्यांनी मला सांगितले की अस्पृश्यता हिंदू समाजात कित्येक शतके घट्ट मूळ धरून बसल्यामुळे एकदम नष्ट होणे शक्य नाही व याकरिता तुम्ही हिंदू समाजास अवसर द्या. कित्येक शतकांची चाल एकाएकी नाहीशी होणे शक्‍य नाही. ही गोष्ट अगदी खरी आहे. ती नाहीशी करण्याकरिता अव्याहत प्रयत्न चालू ठेवला पाहिजे हेही मला कबूल आहे. पण ती चाल नष्ट करणे म्हणजे काय हे आपण पाहिले पाहिजे. महात्मा. गांधींनी मंदीर प्रवेशाची चळवळ हाती घेतली त्यावेळेस ते असे म्हणाले की, अस्पृश्यांचा मंदिरात शिरकाव करून घेणे हे ध्येय ठेवून हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र अशा ठिकाणी त्यांचा रिघाव करून घेतल्यास, अस्पृश्यता नष्ट होईल व आज विहिरी, तळी, शाळा इत्यादि स्थळांसारखी देवालयापेक्षा कमी दर्जाची जी स्थळे आहेत ती अस्पृश्यांस मग आपोआप मोकळी होतील. या त्यांच्या विचारसरणीचा मतितार्थ असा की, अस्पृश्यतेच्या वर्मावर घाव घालावयाचा व त्यायोगे अस्पृश्यतेची मगरमिठी सैल करावयाची. त्यांच्या दृष्टीने मंदीर प्रवेश ही पहिली व शेवटची पायरी होय. मला ही विचारसरणी संमत नाही. माझे असे ठाम मत आहे की, अस्पृश्यता ही चातुर्वर्ण्यं कल्पनेवर उभारलेली इमारत आहे. हिंदू समाजातील जातीभेद हे त्याचे प्रतिबिंब आहे. हिंदू समाजास ग्रासून टाकणाऱ्या या कल्पनेस मूठमाती देऊन समाजातील प्रत्येक व्यक्तीस आपल्या बुद्धीचा विकास करण्याची संधी दिल्याशिवाय किंवा जातीभेदाच्या कल्पनेस मुळातच विरोध केल्याशिवाय हिंदू समाजाची सर्वांगीण सुधारणा होणार नाही. अस्पृश्यतेचे मूळ वरपांगी दिसणाऱ्या हिंदू समाज रचनेच्या पृष्ठभागावरच पसरलेले नसून ते जातीभेदाच्या कल्पनेत खोल गेले असून तेथे दृढ झालेले आहे. आणि अस्पृश्यता समूळ नष्ट करावयाची असेल तर जातीभेदांचे हे मूळ आज सुधारकांनी उखडून काढले पाहिजे. आता हे कार्य अवघड आहे व ते पार पाडण्यास अवधी लागेल हे न समजण्याइतके genre माझ्या ठिकाणी नाही. मी इतकेच म्हणतो की, हे ध्येय मानून किंवा हे तत्त्व मान्य करून तुम्हास जे जरूर वाटतील ते प्रयत्न करा, तपशीलाबद्दल माझे विशेष म्हणणे नाही. तो निरनिराळया ठिकाणी, निरनिराळ्या काळी व निरनिराळया समाजात भिन्न भिन्न असू शकेल, पण खेदाची गोष्ट ही की ते तत्त्वच मुळी हिंदू समाजास मान्य नाही. नाईलाज आहे.