गुलाम म्हणून अपमान किती दिवस सहन करणार ? ४२७
हिंदू धर्मातील अगदी निकृष्ट स्थितीत असलेल्या समाजाने आपल्यावर कोणता जुलूम होतो हे जाणून त्यातून मुक्त होण्याकरिता आपल्यास काय हवे आहे हे स्वय॑निर्णयाच्या न्यायाने ठरविण्याचा अधिकार अस्पृश्य समाजासच असला पाहिजे ; पण हिंदू समाज ही साधी गोष्टही मान्य करण्यास तयार नाही. अस्पृश्य समाजास आजपर्यंत गुलामगिरीत ठेवून त्यांनी भविष्यकाळी कोण्या स्थितीत राहावे हे ठरविण्याचा अधिकार हिंदू समाज आपल्या हातात ठेवू पाहात आहे. राजकीय क्षेत्रात डोमिनिअन स्टेटस म्हणजे वसाहतीचे स्वराज्य हे ध्येय ठेवून राजकीय अधिकार हप्त्याहप्त्याने हिंदुस्थानातील लोक घेत आहेत. तद्वतच अस्पृश्य समाज आज आंपले एक ध्येय ठरवून ते हप्त्याहप्त्याने घेण्यास आपण तयार आहो असे सांगत आहे. ब्रिटिश सरकारने हिंदुस्थानास डोमिनिअन स्टेटस देऊन त्यास आपल्या बरोबरीच्या नात्याने वागविण्याचे आपले ध्येय आहे असे कबूल केले आहे ; पण हिंदू समाज मनाचा एवढा दिलदारपणाही दाखविण्यास तयार नाही. इतकेच नव्हे तर अस्पृश्य समाजास आपला म्हणण्याची देखील त्यांची तयारी नाही.
महात्मा गांधींच्या प्राणान्तिक उपासानंतर वरिष्ठ कायदे कौन्सिलात एका हिंदुने मंदीर प्रवेशाचे बिल आणले होते. हिंदू समाजास अस्पृश्यांबद्दल प्रेमाचा पाझर फुटला आहे असा म. गांधींच्या उपवासानंतर जिकडे तिकडे बोलबाला झाला होता. मंदीर प्रवेशाचे बिल बिनाविरोध पास होईल अशी बढाईही मारण्यात येत होती. या बिलापासून आपली उन्नती जवळ येईल अशी आशा बाळगण्याजोगे त्या बिलात काहीच नसल्यामुळे त्या बिलाच्या भवितव्यतेबद्दल अर्थातच अस्पृश्य समाज बेफिकीर होता. हिंदुंच्या देवालयाबद्दल हे बिल असल्यामुळे अस्पृश्य समाजास त्यात लुडबूड करण्याचे काहीच कारण [नव्हते ] [व ] त्यामुळेच हे बिल कायदेमंडळासमोर असताना ते गाडले गेल्यानंतरही त्या बिलाची विचारपूस त्यांनी केली नाही. बिल पास झाले असते तर अस्पृश्य समाजास आनंदाच्या उकळ्या फुटल्या नसत्या आणि ते मागे घेतले गेले [म्हणून ] [त्यांना ] खिन्नता वाटली नाही. तुमच्या मंदिराबद्दल तुम्ही पाहून घ्या. देवालयासारखी धार्मिक ठिकाणे अस्पृश्यांस खुली करून [त्यांचे ] [प्रेम ] [संपादन ] [करून ] [अगर ] [ती ] बंद करून त्यात प्रवेश करण्याचा अस्पृश्यांस [मज्जाव ] [करणे ] [हे ] [हिंदू ] [समाजाचे ] काम आहे. आमचे नव्हे. पण इतका शहाणपणा दाखविला तर तो [हिंदू ] [धर्म ] कसला ! शेवटी व्हायचे तेच झाले [! ] [बिलास ] [पुरेशी ] [मते ] [न ] [पडून ] [ते ] [नापास ] [झाले ] असे नाही तर सर्व हिंदू समाजाने [त्यास ] [असा ] [कडक ] [विरोध ] [केला ] [की ] [बिलाचे ]
जनकच ते वादविवादाकरिताही [पुढे ] [आणण्यास ] [धजले ] [नाहीत. ] ते बिल काखेत
मारून रंगा आयरना मागे पळ [काढावा ] [लागला. ] आपण हिंदू समाजास आपले हृद्गत खुले करण्यास [पूर्ण ] [मुभा ] [दिली ] [व ] [आपण ] [तटस्थ ] [वृत्ती ] [धारण ] [केली. ]