४३२ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
हिंदू धर्मात जन्म घेतल्याचा आम्हाला लागलेला हा डागच आमच्या प्रगतीच्या आड येत आहे, आमच्या साऱ्या मानहानीचे, सवर्ण हिंदुंच्या आमच्या बाबतीत तुच्छतापर वर्तनाचे तेच एक कारण आहे. असे जर आहे, तर त्या धर्माच्या नावाचा केवळ शिक्का घेऊन बसण्यात काय अर्थ आहे ? ज्याप्रमाणे आम्हाला मनुष्याच्या मोलाने राहता येण्यात सुद्धा मज्जाव केला जात आहे, त्या हिंदू धर्माच्या कलशाचा एक भाग होऊन आम्ही का म्हणून आयुष्य घालवावे ? अशा स्थितीत राहाण्यापेक्षा या धर्मातून बाहेर पडून दुसऱ्या एखाद्या धर्माचा, ज्यामध्ये आपल्याला आज ही मानखंडना सहन करण्याचा प्रसंग येणार नाही, हलक्या नीच दजनि वावरण्याची सवय होणार नाही, त्या धर्माचा अंगीकार करणे उचितच नाही का ?
अस्पृश्यांनी हिंदू धर्माचा त्याग केल्यानंतर कोणता धर्म स्वीकारावयाचा हे प्रत्येकाच्या मर्जीवर अवलंबून आहे. फक्त समानतेचे हकक मिळतील असाच धर्म त्यांनी स्वीकारावा. i.
दुर्दैवाने अस्पृश्य हिंदू असा डाग घेऊन मी जन्माला आलो, पण ती गोष्ट माझ्या स्वाधीन नव्हती. तथापि, हा नीच दर्जा झुगारून देऊन ही स्थिती सुधारणे मला शक्य आहे आणि ते मी करणारच याबद्दल मुळीच संशय नको. मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो की, हिंदू म्हणवून घेत मी मरणार नाही.
_ हिंदू धर्मात आपला समान दर्जा प्रस्थापित करण्यासाठी सत्याग्रहाच्या मार्गाने जाऊन काही मिळणार नाही. त्या मार्गाची आता आवश्यकताही नाही, आपला समाज आता हिंदूधर्मापासून विलग व स्वतंत्र असा मानला पाहिजे, अर्थातच नागरिकत्वाच्या व राजकीय हक्कासाठी आपला झगडा पुढे चालू ठेवणे आवश्यकच आहे आणि याकरिता आपले आपसातले मतभेद, अंतस्थ कलह विसरून जाऊन एकजुटीने संघटीतपणे आपले ध्येय गाठण्याचा प्रयत्न करणे हेच आपले आजचे कार्य होय.
नव्या घटनेत दलित वर्गाने आपले हक्क जोराने पुढे मांडण्यासाठी खरे कळकळीचे प्रतिनिधी निवडणे जरुर आहे. हिंदू धर्माच्या शुंखलांनी जखडून न राहता स्वतंत्रपणे आपले कर्तव्य ठरविण्याची आपली मनापासून इच्छा आहे, हे दलित वर्गाने जगाला स्पष्ट दाखवून द्यावे. एवढीच माझी त्यांना विनंती आहे. ' *
तला तम PR
१ विविध वृत्त : २० आँक्टोबर १९३५.