अस्पृश्य हिंदू म्हणून जन्माला . . . . .. मी मरणार नाही ४३३
या भाषणाला पाठिंबा देण्याचा ठराव बाबासाहेबांनी मांडला आणि तो मंजूर करण्यात आला. तो ठराव स्वतः बाबासाहेबांनी लिहून आणलेला होता."
येवला परिषदेचा ठराव.-- |
““ अस्पृश्य मानलेले वर्ग व स्पृश्य मानलेले वर्ग यामध्ये समता व संघटना घडवून आणण्याच्या हेतूने तितके सामर्थ्य नसताही माणसांची व द्रव्याची अपरिमित हानी सोसून मुंबई इलाख्यातील अस्पृश्य वर्गांनी महाड येथे चवदार तळ्यावर व नाशिक येथे काळाराम मंदिरावर सत्याग्रह केला. काळाराम मंदिराचा सत्याग्रह तर गेली सहा वर्षे सतत चालविण्यात आला. परंतु स्पृश्य मानलेल्या हिंदुंचे किचितही मतपरिवर्तन झाल्याचे दिसत नाही. इतकेच नव्हे तर स्पृश्य व अस्पृश्य या उभयतांतील होऊ घातलेल्या संघटनेला व तद्जन्य उत्पन्न होणाऱ्या हिंदू समाजाच्या सामर्थ्याला कवडीचीही किंमत देत नाहीत असे त्यांनी आपल्या वर्तनाने सिद्ध केले आहे. म्हणून अस्पृश्य वर्गाची ही परिषद असा ठराव पसार करीत आहे की, हिंदुंची मनधरणी करण्याच्या त्यांचा प्रयत्नांचा काहीही उपयोग होत नसल्याने त्याबाबतीत अस्पृश्य वर्गाने आपले सामर्थ्य आता विनाकारण मुळीच खर्च करू नये व सत्याग्रहाची मोहीम यापुढे बंद करावी. आणि स्पृश्य मानलेल्या वर्गापासून आपला समाज स्वतंत्र करावा व हिंदुस्थानातील अन्य समाजामध्ये आपल्या समाजाला मानाचे व समतेचे स्थान मिळविण्याकरिता अस्पृश्य वर्गाने एकनिष्ठेने प्रयत्न करावा असे या परिषदेचे मत आहे. “२
' डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे मुद्देसूद भाषण आणि त्याला अनुसरून मांडलेल्या ठरावामुळे प्रेक्षकातील तरूण पिढीला फार आनंद झाला. वृद्ध लोक व स्त्रिया हे धर्मभोळे, त्यांना या घोषणेने चमत्कारिक वाटले. तरीही साहेबांचे पोटतिडिकीने केलेले जळजळीत भाषण ऐकूण त्यांनीही ठरावाला संमती दिली. हिंदू लोक अस्पृश्यांना खालच्या पायरीवरचे हिंदू म्हणून छळतात. ते परधर्मात गेले तर या छळातून मुक्त होतील व स्वतःच्या हिंमतीवर उपजीविका करतील, शिक्षण घेऊन ते स्वतःची प्रगती घडवून आणतील. या मुद्यांवर साहेबांचे भाषण एक तासभर झाले. सारे लोक मंत्रमुग्ध होऊन भाषण ऐकत होते. ठराव टाळ्यांच्या प्रचंड गजरात मंजूर झाला. |
१ डॉ. भी. रा. आंबेडकर चरित्र : चां. भ. खैरमोडे, खंड ६ वा, पू. ८५
२ जनता : १५ फेब्रुवारी १९३६