४३६ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
दुसऱ्या दिवशी आम्ही ज्या सभेचे वर्णन करण्यासाठी हा लेख लिहित आहोत ती जंगी जाहीर सभा झाली. तिसऱ्या दिवशी पालखीची मिरवणूक व भोजन समारंभ हे कार्यक्रम जाहीर झालेले होते. या उत्सवाप्रित्यर्थ हजारो रुपये खर्च होत असून अस्पृश्य समाज आनंदाची मौज लुटीत असतो. अशा उत्सवातील एका अत्यंत महत्त्वाच्या सभेस हजर राहून भाषण करण्याचा योग आम्हास लाभला हे आमचे भाग्यच नव्हे काय ? हा यंदाचा उत्सव अखेरचाच ठरल्यास आम्हास लाभलेला योग अधिकच भाग्याचा ठरतो यात शंका नाही.
आम्ही सदर सभेस हजर राहाण्यासाठी गेल्या रविवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास सभास्थानी दाखल झालो. एका लहानशा देवीच्या देवळापुढे सभास्थान श्रृंगारण्यात आले असून समोरील जंगीच्या जंगी रस्ता सभेसाठी नियोजित करण्यात आला होता. देवीच्या घुमटावर कापडाचा एक बोर्ड लावण्यात आला असून त्यावर बत्तीसावा दत्तजयंत्युत्सव-मॅनेजर-रेवजीबोवा डोळस असे मोठ्या अक्षरात लिहिले होते. देवळाच्या समोरील रस्ता ध्वजा, पताका, बावटे आणि कागदांच्या फुलांची छते वगैरेंनी श्रृंगारण्यात आला होता. रस्त्यावर श्रोतू समाजाची बसण्याची व्यवस्था करण्यात आली असून डाव्या हाताला स्त्री समाज बसलेला दिसत होता. देवळापुढे एक जंगी व्यासपीठ मांडण्यात आले असून त्यावर सतरंजी व गालीचे पसरण्यात आले होते व व्यासपीठाच्या मध्यभागी एक चौरस मेज ठेवण्यात आले असून दोन मखमलीच्या दरबारी खुर्च्या ठेवलेल्या होत्या. व्यासपीठावर इतर पाहुणे मंडळींसाठी हिरव्या मखमलीची कोचे मांडण्यात आली होती. व्यासपीठाच्या आजूबाजूस आणखीही कोचे, खुर्च्या व बाके भरपूर मांडलेली होती. आम्ही गेलो त्यावेळी सभास्थानी पाच हजारावर sig समाज जमलेला दिसला. श्रोतृ समाजात अस्पृश्यांचाच भरणा विशेष असला तरी पन्नास पाऊणशे मुसलमान, दहा पाच खिस्ती व एक वयोवृद्ध पारशी गृहस्थ असे परधर्मीय लोक मधून मधून तुरळक बसलेले दृष्टीस पडत होते. आम्हाला मोठ्या प्रेमाने एका Ways व्यासपीठावरील कोचावर नेऊन बसविले... आमच्या शेजारी श्री. अडांगळे व वडवलकर बसले असल्यामुळे एकंदर गप्पागोष्टीस विशेष मजा आली. हे अस्पृश्य बंधु हल्ली आमचे परममित्र झालेले आहेत. डॉ. आंबेडकरास व त्यांच्या सहकारी मित्रमंडळीस आणण्यासाठी श्री. रेवजी बोवा गेले 'होते, म्हणून मध्यंतरीच्या रिकाम्या वेळेत काही मनोरंजक कार्यक्रम करण्यात आले. आम्ही गेलो त्यावेळी एका गोड आवाजाच्या मुलाचे सुस्वर गायन चालू होते. त्या गायनानंतर श्री. फाळके यांनी पोवाडा गाऊन दाखविला. त्यानंतर जलशाचाही लहानसा कार्यक्रम झाला. अशा प्रकारे जरी निरनिराळे कार्यक्रम चालू होते तरी सर्व