८-१२-१९३५ जो धर्म माणसांना माणूसकीने वागवीत नाही त्याला धर्म कसे म्हणावे ? - Page 481

जो धर्म माणसांना माणुसकीने . . . . . धर्म कसे म्हणावे ४३७

श्रोतृ समाजाचे लक्ष डॉ. आंबेडकरांच्या वाटेकडे लागले होते. श्रोत्यांची संख्या वाढता वाढता दहा वाजण्याच्या सुमारास ती दहा हजारांवर गेली. शेवटी सव्वा दहाच्या सुमारास सभास्थानाजवळ दोन भव्य मोटारी पों पों करीत येऊन थडकल्या. या मोटारीतून आपल्या मित्रमंडळीसमवेत डॉ. आंबेडकर आले. आंबेडकर आले असे समजताच टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटाने वातावरण दुमदुमून गेले. श्रोतृ समाजाने डॉ. आंबेडकरांचे जे प्रचंड स्वागत केले ते एखाद्या किरीटकुंडलधारी सार्वभौमालाही हेवा वाटण्याजोगे होते. त्यांच्या नावाचा जयघोष चालू असतानाच डॉ. आंबेडकर व्यासपीठावर मांडलेल्या दरबारी खुर्चीवर जाऊन बसले. त्यांच्या शेजारी सभेचे नियोजित अध्यक्ष श्री. देवराव नाईक तसल्याच एका जाड खुर्चीवर जाऊन बसले. त्यांच्याबरोबर आलेली प्रि. दोंदे, श्री. सुरबा टिपणीस, बापूसाहेब सहस्त्रबुद्धे इत्यादी त्यांच्या आजुबाजूच्या कोचावर अधिष्ठित झाली. अस्पृश्य समाजाचे दुसरे एक थोर आणि सन्मान्य पुढारी डॉ. सोळंकी यांस आणण्यासाठी मोटार गेली असल्याने ते येऊन दाखल होईपर्यंत सभास्थानी जलशाचा कार्यक्रम पुढे चालू ठेवण्यात आला. थोड्या वेळाने डॉ. सोळंकीची स्वारी सभास्थानी दाखल झाली. व्यवस्थापक मंडळाने त्यांचेही थाटाने स्वागत केले. लोकांनीही टाळ्यांचा गजर करून आपली संमती दिली. डॉ. सोळंकी, डॉ. आंबेडकरां- शेजारील खुर्चीवर विराजमान झाल्यावर श्री. रेवजी बोवांनी सभेच्या कामास सुरवात केली. अध्यक्षांच्या सूचनेला अनुमोदन दिल्यानंतर श्री. देवराव नाईक यांनी प्रारंभीचे लहानसे भाषण केले. त्यानंतर श्री. सुरबा टिपणीस यांचे भाषण

झाले.

यानंतर अध्यक्षांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांस भाषण करण्याविषयी नप्रतापूर्वक विनंती केली. डॉ. आंबेडकर हातात एक लहानशी काठी घेऊन टेबलाच्या पुढे येऊन उभे राहिले. टाळ्यांचा प्रचंड गजर दुमदुमला ! बाबासाहेबांनी डोक्याला काही एक घातलेले नव्हते व पोषाख अगदी साधा केला होता. पायात लाँग क्लॉथचा लेंगा व अंगात सोलापुरी चेकचा कोट असा त्यांचा साधासुधा थाट होता. अत्यंत गंभीर वाणीने डॉ. आंबेडकर

म्हणाले, |

सभापती महाशय आणि बंधुभगिनींनो,

मला प्रारंभी एक दोन गोष्टींचा खुलासा केला पाहिजे. गेल्या सालच्या उत्सवाला मी आलो नव्हतो. या सालीही असल्या दत्तजयंतीसारख्या उत्सवात भाषण करणे योग्य नव्हे, पण रेवजी बुवांनी हा शेवटचाच उत्सव होईल असे आश्वासन दिले असल्यामुळे मी आलो आहे. या ठिकाणी धर्मातरासारख्या विषयावर बोलणेही बरे नव्हे. पण मला काही तरी दोन शब्द बोलणे आता भागच