१२-१-१९३६ धर्मातराने सर्व अल्पसंख्यांकांचे कल्याण होइल - Page 486

४४२ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

महाराष्ट्र अस्पृश्य तरूण परिषदेत डॉ. सोळंकी यांचे भाषण झाल्यानंतर अस्पृश्य वर्गाचे लोकप्रिय पुढारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे बोलावयास उभे राहिले. त्यावेळी सुमारे पाच मिनिटे एकसारखा टाळ्यांचा कडकडाट चालू होता. शिंगे व Gara वाजत होत्या व आंबेडकरांच्या जयजयकाराने तेथील सबंध वातावरण दुमदुमून गेले होते. डॉ. आंबेडकर यांना पाहाण्यासाठी लोक एकसारखे पुढे घुसत होते. त्यावेळी स्वयंसेवकांना बंदोबस्त ठेवणे मुष्किलीचे झाले. अखेरीस पाच मिनिटेपर्यंत डॉक्टरसाहेबांना पाहून झाल्यानंतर प्रत्येकाचे समाधान झाले व मग आपोआप सर्वत्र शांतता झाली. त्या शांत वातावरणात डॉक्टरसाहेबांनी गंभीर आवाजात आपल्या भाषणास सुरवात केली. ते म्हणाले,

सभापती, माझे बांधव व भगिनींनो,

आज या ठिकाणी कोणाही वक्त्याने भाषण करण्यापूर्वी आपली जात सांगावी

असा दंडक अध्यक्षांनी घातला आहे. तेव्हा माझ्या या काळ्या रंगाच्या दोऱ्यावरून (घड्याळाची काळी फीत दाखवून) आपणास माझी जात समजून आली असेलच (हंशा). आजच्या या परिषदेपुढे माझे निराळे भाषण करण्याचे काही प्रयोजन आहे, असे मला वाटत नाही. ज्यावेळी ही परिषद होण्याचे ठरले त्यावेळी येथील तरुणांनी या परिषदेचे अध्यक्षस्थान स्वीकारावे असे मी सुचविले होते. परंतु मी स्वतःची गणना तरुणात करीत नसल्यामुळे ते अध्यक्षपद नाकारले. तरीपण आज एका कारणाकरिता तरी मला बोलणे भाग आहे आणि ते कारण म्हणजे आपले आजचे अध्यक्ष प्रो. शिवराज यांचे आभार मानणे हे होय. प्रो. शिवराज यांच्यामागे त्यांच्या कॉलेजची अनेक कामे असताही ते स्वतःची अडचण सोसून या ठिकाणी आले व आपली ही परिषद त्यांनी यशस्वीरीतीने पार पाडली याबद्दल त्यांचे आभार मानणे हे माझे कर्तव्य आहे (टाळया). जातीभेद आहे तसा या देशात प्रांतभेदही जबरदस्त आहे. आपल्या उन्नतीकरिता या देशातील सर्व प्रांतांच्या अस्पृश्यांचे संघटन होणे जरूर आहे. परंतु प्रांताप्रांतातील भाषाभेद अस्पृश्यांच्या एकीकरणाला घातक आहेत. त्या दृष्टीने पाहता आज मुंबई इलाख्यातील व महाराष्ट्रातील अस्पृश्य समाजाने मद्रदेशीय अस्पृश्य पुढाऱ्यास हे अध्यक्षस्थान दिले ही आनंदाची व संघटमेच्यादृष्टीने उत्तेजनपर अशीच गोष्ट घडली आहे (टाळ्या). यापुढेही आमच्यातील तरुण व वृद्ध सर्वच अशी संघटना वाढवून या देशातील सर्व अस्पृश्य समाजात प्रेम व सहकार दृढ करतील अशी मला आशा आहे. |

सध्या अस्पृश्यांची म्हणजे आपली ही जी चळवळ चालू आहे तिला ' एका गारुड्याचा तमाशा ' किंवा ` ‘One man show’ म्हणून संबोधले जाते. कोणत्याही समाजात केवळ एका माणसाने केलेली चळवळ