धर्मातराने सर्व . . . . . . .. कल्याण होईल ४४३
यशाच्या कळसापर्यंत जात नाही. तेव्हा आपली ही चळवळ यशस्वी व्हावयाची असेल, तर एकाच Sara हा खेळ खेळून भागणार नाही. त्यास अनेक सवंगड्यांची जरूरी आहे. हा खेळ खेळता खेळता एक गारुडी मरून पडला, तर त्याच्या जागी त्याचे STAG घेऊन बडवण्यास उभा राहाणारा दुसरा गारुडी तयार असला पाहिजे. आतापर्यंत या बाबतीत मी जरा साशंक होतो, परंतु आजची ही सभा पाहून माझ्या मनातील त्यासंबंधीची शंका दूर झाली आहे (टाळ्या). माझ्यानंतर माझे कार्य चालविण्यास अनेक कार्यकर्ते या पुण्याच्या अस्पृश्य तरुणांतूनच बाहेर येतील. याबद्दल मी त्यांना धन्यवाद देत आहे
(टाळ्या). :
आता यापेक्षा याप्रसंगी विशेष काही भाषण करावे असे मला वाटत नव्हते. तथापि, ज्या मुख्य विषयाची चर्चा या. ठिकाणी झाली, त्यासंबंधी मी जर काहीच बोललो नाही तर आपली फार निराशा होईल हे मी जाणतो आणि म्हणून
मी जाहीर केलेल्या धर्मांतराच्या प्रश्नावर थोडे बोलतो.
मी धर्मातर करण्याचे जाहीर केल्यापासून माझ्याकडे अनेक लोक येऊन त्याविषयी ऊहापोह करतात. त्या टीकाकार मंडळीत दोन प्रकारचे वर्ग आहेत. एका प्रकारच्या लोकांचे म्हणणे असे की, मी अस्पृश्यांच्या हिताच्या दृष्टीने ज्या काही अटी असतील त्या स्पृश्य हिंदुंच्यापुढे मांडाव्या आणि त्या अटी जर स्पृश्य हिंदुंकडून पूर्ण झाल्या नाहीत तर मग घर्मातरास सिद्ध व्हावे.
दुसऱ्या एका प्रकारच्या लोकांचे म्हणणे असे की, अस्पृश्यांच्या धर्मातराने विशेष फायदा होणार नाही. तेव्हा त्यांनी धर्मांतर करु नये.
घर्मातराने फायदा होईल किंवा नाही, फायदा झाल्यास तो किती प्रमाणात होईल याविषयी वादविवाद किंवा चर्चा करण्याचे हे ठिकाण नाही व तितका आता वेळही नाही. तेव्हा येशू खिस्ताने ज्यू लोकांना आपल्या नव्या धर्माबद्दल सांगताना ज्याप्रमाणे म्हटले की, ‘Be unto me, Little children and | will save you from Sin’ (' लहान लेकरे आपल्या आईबापांवर विश्वास टाकतात त्याप्रमाणे तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा व मी सांगतो तो धर्म पाळा') याच येशू खिस्ताप्रमाणे मी आज तुम्हास एवढे सांगू शकतो की, ' मजवर तुमचा विश्वास असेल तर या धर्मांतरामुळे तुमचा फायदाच होईल ' (प्रचंड टाळ्या) एवढेच सांगून मी येथून जावे असे नाही. तर याबाबत मी बरोबर संशयनिवृत्ती करून देईल, पण आज तेवढा वेळ नसल्यामुळे येशू ख्रिस्ताने ज्यू लोकांना त्या काळी दिलेले उत्तर मी आज तुम्हास देऊन थांबत आहे.
जे लोक मला असे सांगतात की, तुम्ही हिंदू धर्मात राहून स्वाभिमानाने जीवन कंठण्यास अवश्य अशा आपल्या अटी स्पृश्य हिंदुंपुढे मांडा व त्या अटी