१२-१-१९३६ धर्मातराने सर्व अल्पसंख्यांकांचे कल्याण होइल - Page 488

४४४ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

स्पृश्य हिंदू पाळतात किवा नाही ते पहा. त्या लोकांना मला एवढेच सांगावयाचे आहे की, मी ज्या अटी मांडीन त्या स्पृश्य हिंदूंना केव्हाही पूर्ण करता येणार नाहीत अशी माझी बालंबाल खात्री झाली आहे. माझी अट रुपयांची नाही, अगर भाकरीचीही नाही तर माझी अट त्यापेक्षाही फार मोठी आहे. ती अट कोणती आहे हे ज्यांना ऐकावयाचे असेल किंवा पार पाडण्याची ज्यांची तयारी असेल त्यांनी माझ्याकडे यावे, पण माझी याबाबत पक्की खात्री आहे की, ती अट पाळणे स्पृश्य हिंदुंना किमपी शक्य नाही (टाळ्या).

जगातील प्रत्येक समाजाचे भवितव्य त्या त्या समाजातील सुशिक्षित लोकांवर अवलंबून असते. आजपर्यंत तुमच्यात चळवळ झाली नाही याचे कारण तुमच्यात कोणी शिकलेले लोकच नव्हते. शिक्षणामुळे माणसाला व समाजाला डोळसपणा प्राप्त होतो आणि त्यादृष्टीने पाहता सबंध हिंदुंमध्ये जर कोणी खरा डोळस समाज असेल तर तो ब्राह्मण समाज हा एकटाच डोळस आहे. हे नाकबूल करता येणार नाही. ब्राह्मणेतर मराठा व तत्सम समाज हे तितके डोळस नाहीत. या बाबतीत ब्राह्मणांची जबाबदारी फार मोठी आहे. परंतु ब्राह्मण जातीची वृत्ती कशी आहे याची तुम्हास बरोबर ओळख झालेली नाही. ब्राह्मणांपुढे तुम्ही कोणताही प्रश्‍न टाका व त्यावर सर्व समाजाच्या कल्याणाच्या दृष्टीने काही तोड सुचवा, ही तोड जर ब्राह्मणाच्या वर्चस्वास धक्का देणारी नसेल तर ते झटकन मान्य करतील, पण तुम्ही सुचविलेल्या तोडीमुळे जरा का त्यांच्या ब्राह्मणी वर्चस्वाला थोडातरी धक्का लागण्याचा संभव असेल तर राष्ट्राचा कितीही मोठा फायदा होत असेल तरी ती तोड ब्राह्मण समाज कधी हाती घेणार नाही. तेव्हा तो समाज आपल्या अटी पार पाडण्याची जबाबदारी घेईल, अशी आशा करण्यात काहीच अर्थ नाही. `

कोणतीही गोष्ट काही तरी दिल्याखेरीज मिळत नसते. त्याप्रमाणे स्पृश्य अगर ब्राह्मण समाजाने तुमच्याकरिता काही तरी करण्यापूर्वी त्यांना तुम्ही काही तरी दिले पाहिजे. पण ते काय द्यावे लागणार आहे हे तुमच्या लक्षात आले काय ? ते लक्षात येण्यासाठी निवापसुत्तात भगवान बुद्धानी सांगितलेली गोष्ट मी सांगतो. श्रावस्तीमध्ये अनाथ पिंडिकाच्या आश्रमात राहत असता भिक्षुंना उद्देशून भगवान बुद्ध म्हणाला की, भिक्खुहो, राजा आपल्या राखीव जंगलात हरिण, गवे, ससे वगैरे प्राणी पाळून ठेवतो, त्यांची योग्यप्रकारे जोपासना करतो, त्यांना ममतेने वाढवितो. पण हे सर्व कशाकरिता? त्या प्राण्यांना ठार करण्याकरिता. आपली मृगयेची भूक भागविण्यासाठी राजा त्या गरीब दुबळ्या प्राण्यांची जोपासना करीत असतो. त्याचप्रमाणे आज स्पृश्य हिंदू अगर