१२-१-१९३६ धर्मातराने सर्व अल्पसंख्यांकांचे कल्याण होइल - Page 489

धर्मातराने सर्व... . . . . , कल्याण होईल ४४५

ब्राह्मण तुम्हास काही जादा सवलती देऊ करून आपल्याच धर्मात ठेवू पाहात आहेत ते तुमच्या कल्याणासाठी नसून तुम्हास कायमचे त्यांच्या गुलामगिरीत जखडून ठेवण्याकरिताच आहे. (शेम शेम).

मं. गांधींनी ९ लाखांचा फंड गोळा केला, तो काही तुमच्या खऱ्या हितासाठी नसून तुम्ही त्यांच्या काँग्रेसला सोडून जाऊ नये, काँग्रेसचे वजन कायम राहावे म्हणून. त्यांनी टाकलेले दयेचे तुकडे चघळून स्पृश्यांच्या दारात कायमचे गुलाम म्हणून आपण पडून राहावे म्हणून स्पृश्य हिंदुंचे हे सर्व उद्योग आहेत. माझे त्या सर्वाना असे सांगणे आहे की, आता ' स्पृश्य हिंदुनी माझ्यापुढे प्रत्यक्ष परमेश्वर आणून उभा केला तरी मी हिंदु धर्मातून जाणार ! ' (प्रचंड टाळ्या, जयजयकार व शिंग तुताऱ्यांचे आवाज) आता यापुढे स्पृश्य हिंदुंनी अस्पृश्य समाजाकरिता काहीही कार्य केले नाही तरी मी जाणार व काहीही केले तरीही मी जाणार ! (टाळ्या)

आता हे धर्मातर आपणापैकी कोणीही एकट्या दुकट्याने करावयाचे नसून सबंध अस्पृश्य समाजाने, एकदम सर्वानी मिळून करावयाचे आहे. आम्ही धर्मातर केल्याने आमच्यापुढे स्वर्गच अवतरणार आहे किंवा अमृताचा पाऊस पडणार आहे, असे मी मुळीच म्हणणार नाही. आम्ही मुसलमान, खिस्ती किंवा शीख झालो तरी तेथेही आमच्या भवितव्याकरिता झगडा करावा लागणार आहे, हे आम्ही ओळखतो. उद्या आपण मुसलमान झाल्याबरोबर सर्वच नबाब होणार नाही, शीख झाल्याबरोबर सरदार होणार नाही किंवा खिस्ती झाल्याबरोबर पोप होणार नाही, (हंशा) कोठेही आपण गेलो तरी आपणास लढा हा करावा लागणारच आहे. तेव्हा तो लढा लढविण्यासाठी आपण आपली संघशक्ती वाढविली पाहिजे. वैयक्तिक फायद्याकरिता आपणास चोरट्या व्यवहाराने धर्मातर करावयाचे नसून हातावर शिरकमले घेऊन जेथे जाऊ तेथे लढावयाचे, या निश्चयाने धर्मातर करावयाचे आहे. उद्या मुसलमान अगर खिस्ती झाल्यावर ते लोक जर.आम्हास महार खिस्ती म्हणून निराळ्या चर्चमध्ये जाण्यास सांगू लागले, तर आम्ही तसल्या चर्चला आग लावू. मी काही साधाभोळा नाही. जेथे जाईल तेथे काट्यासारखा बोचत राहीन! (हंशा व प्रचंड टाळया) म्हणून माझे तुम्हास पुन्हा पुन्हा सांगणे आहे की, धर्मांतर करावयाचे हे नक्की असेल, तर एकटे दुकटे कोठे जाऊन फसू नका. आजच कोणीही खिस्ती किंवा मुसलमान होऊ नका. मी ओळखून आहे की, आमच्या या घोषणेमुळे पुष्कळांना मोठमोठ्या आशा लागल्या आहेत. आता मला माझ्या महार बंधुंना एवढेच सांगावयाचे आहे की, बाबांनो, तुम्ही अस्पृश्यांतील जातिभेद यापुढे तरी शिल्लक ठेवू नका (टाळया). महारास ब्राह्मण समाजाचे वर्चस्व सहन होत नाही, त्याचप्रमाणे अस्पृश्यांमधील अल्पसंख्यांक मांग, भंगी वगैरे