४५२ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
नंतर तीन-तीन माणसांची एक अशारीतीने रांगा लावण्यात आल्या. मुंबईचे
श्री. अर्जुनराव साळवी यांनी सर्व लोकास शिस्तीने उभे केले व नंतर मिरवणुकीस
सुरवात झाली. अग्रभागी पनवेल हनुमान व्यायाम शाळेचा स्काऊटचा बँड व
मध्यभागी स्थानिक वाद्ये वाजत होती.
मिरवणूक कायस्थ आळी, ब्राह्मण आळी, बाजार वगैरे गावातील प्रमुख
वस्तीतील रस्त्यावरून सभेच्या ठिकाणी सुमारे ११-३० वाजता हजर झाली. वाटेत मिरवणूक एकसारखी वाढत जात होती. ' आंबेडकर जिंदाबाद ', ' हिंदू समाजाचा धिक्कार असो ' ' भट्टशाही नष्ट होवो' ' आंबेडकर कौन है ? दलितोंका राजा है ' ' डॉ. बाबासाहेब आंबेडकरकी जय ' वगैरे जयघोष रस्त्यात एकसारखे चालू होते. मिरवणुकीच्या अग्रभागी श्री. संभाजी गायकवाड, श्री. कमलाकांत चित्रे, दादासाहेब पगारे, वनमाळी मास्तर, भिकाजी धोंडेराव, . वसंत भातनकर, गोविंद बिवकर, भीमराव करडक, रूपाजी पगारे वगैरे मंडळी होती. . श्री. साळवी व त्यांचे इतर तरुण मित्र फिरते राहून मिरवणुकीचे व्यवस्थित स्वरूप कायम ठेवीत होते. पनवेलसारख्या लहानशा शहरात ही मिरवणूक म्हणजे. एक अद्भुत गोष्ट होती. काही कालापूर्वी
- गटाराच्या बाजूने थबकत थबकत व भीतभीत पावले टाकीत चाललेला महार आज बिनदिक्कत छातीठोकपणे आपल्या परमप्रिय पुढाऱ्याचा व. आपल्या वर्गाचा जयघोष करीत राजरस्त्यातून मिरवताना पाहून लोकांच्या हृदयात धडकी उत्पन्न झाल्याशिवाय राहिली नाही. महाराच्या सावलीस उभे न राहणारे लोक व गाडी घोडे या जमावास पाहून वाटेत थबकत होते व गटाराजवळ उभे राहून ' महारास ' रस्ता देत होते. . हे दृश्य पाहून कालगतीचे चक्र फिरले असून हजारो वर्षे गांजून गेलेल्या हतभागी दलित वर्गाच्या भाग्यशाली कालाचा अरुणोदय झाला आहे, असे तुमच्या प्रतिनिधीस वाटल्यास त्यात नवल ते काय ?
सभामंडप गावानजीकच्या आंबराईत गाडेश्वरी नदीच्या काठावर उभारला
होता. मिरवणुकीनंतर सर्व लोकसमुदायास शिस्तवार बसविण्यात आले. सभा सुरू होण्यापूर्वी सभामंडप चिक्कार भरून गेला होता. गावातील ४०-४५ स्पृश्य हिंदू गृहस्थ हजर होते. थोड्याच वेळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपल्या 'मित्रमंडळीसह सभास्थानी हजर झाले. श्री. अनंतराव चित्रे महाडहून व गोविंदराव वरघरकर मुद्दाम परिषदेकरिता यावेळी हजर झाले. . बाबासाहेबांना : सर्व मंडळींनी उत्थापन देऊन त्यांच्या जयजयकारात त्यांचे स्वागत केले. लागलीच मुलींचे कर्णमधुर स्वागतपर गायन झाले आणि स्वागताध्यक्षांनी आपल्या भाषणास सुरवात केली. |