तुम्हाला गुलामाप्रमाणे राहावयाचे . . . . माणसाप्रमाणे जगावयाचे आहे ? ४५३
हे भाषण आटोपल्याबरोबर नियोजित अध्यक्ष डॉ. बाबासाहेब यांस पुष्पहार
अर्पण करण्यात आले |
डॉ. बाबासाहेब बोलण्यास उभे राहिल्याबरोबंर टाळ्यांचा कडकडाट सुरू
झाला. नंतर परिषदेचे अध्यक्षस्थान दिल्याबद्दल आभार व्यक्त करून त्यांनी `
आपल्या भाषणास आरंभ केला. ते म्हणाले
भगिनींनो आणि बंधुजनहो
हा भाग मुंबईच्या नजीक असूनही मला सभेकरिता म्हणून इकडे येता आले.
नाही याबद्दल मला खेद. वाटतो. अनेक व्यवसायामुळे मी आपली भेट घेऊ
शकलो नाही. हजारो ठिकाणाहून लोकजागृतीच्या कामाकरिता मला आमंत्रणे
येतात, परंतु सर्वांचे समाधान करणे मला एकट्याला अशक्य आहे.. मी काही शतमुखी रावण नाही किंवा अंगास राख फासून संन्यासी झालेला नाही. तुमच्याप्रमाणेच मला स्वतःला पोटाचा उद्योग करावा लागतो. तुमच्या. सारखाच परिस्थितीशी झगडणारा मी माणूस आहे
आजचा प्रसंग जरी महत्त्वाचा असला तरी फार पाल्हाळीक भाषण करून आपल्याला मी तिष्ठत बसविणार नाही. मी फक्त थोड्या मुद्यांविषयी बोलणार आहे. विशेषतः तुमचे कर्तव्य काय आहे व तुमचा वाटाड्या म्हणून माझे काय कर्तव्य आहे हे मी आज सांगणार आहे
सद्गृहस्थहो, तुम्ही आज हजारो वर्षे या देशात वास्तव्य करीत आहा. तसेच . तुमचे शेजारी म्हणून इतर लोकही येथे नांदत आहेत. तुमच्या स्थितीचे अवलोकन करून तुमच्या शेजाऱ्यांची स्थिती तुम्ही नीट ध्यानात आणा. तुमच्या दोघांच्या परिस्थितींची तुलना करा. तुम्हाला पहिली गोष्ट दिसून येईल ती ही की, तुम्ही इतर समाजापेक्षा दरिद्री आहात. इतर समाजांना नानाप्रकारचे उद्योग करून भाकरी मिळविण्याचे मार्ग मोकळे असल्यामुळे, त्यांची स्थिती तुमच्यापेक्षा अधिक चांगली आहे. सभेला जावयाचे म्हणून तुम्ही आज आपली नेहमीची लक्तरे बाजूला ठेवून जरा बऱ्यापैकी कपडे अंगात घालून आलेले दिसता. तुम्ही सभेकरिता नीटनेटके आलात याबद्दल मला संतोष वाटतो , पण. तुमची खरी स्थिती काय आहे याची तुमच्याच हाडामांसाच्या मला पूर्ण जाणीव आहे. आठवड्यातून तीन दिवस पोटभर अन्न मिळण्याची तुम्हाला मारामार. अंगावर एखादा फाटका सदरा व एक लंगोटी. ती ल॑गोटीं देखील
लवकर बदलता येत नाही. अशी तुमची कंगाल स्थिती. त्याच्या उलट
पांढरपेशा वर्गाची काय स्थिती आहे? तुमच्या मानाने ते शतपट सुखी आहेत. त्यांच्या घरावर कौले, तर तुमच्या झोपडीवर पुरेसे [बांबू ] [किंवा ] झावळ्याही टाकावयास तुम्हाला मिळत नाहीत. त्यांच्या घरात पितळेची भांडी