८ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
१९२० ची नागपूर परिषद बोलावण्याचे प्रयोजन
१९१७ मध्ये भारतमंत्री माँटेग्यू हिंदुस्थानात आले असता अस्पृश्य समाजाच्या- वतीने त्यांच्या राजकीय मागण्यांबाबत सर नारायणराव चंदावरकर व विठ्ठल रामजी शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली एका शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतली होती. डिप्रेस्ड कलास मिशनचे अध्यक्ष नारायणराव चंदावरकर व वि. रा. शिंदे यांचे अस्पृश्य समाजावर वर्चस्व असल्यामुळे बहुतेक समाज कार्यकर्ते त्यांच्याच सल्लामसलतीने कार्य करीत असत. श्री. गणेश आकाजी गवई व किसन wry बनसोडे यांनीही डिप्रेस्ड इंडिया असोसिएशनचे मार्फत भारतमंत्र्यास अस्पृश्यांच्या मागण्यासंबंधी एक मेमोरॅडम सादर केला होता.
त्यानंतर साऊथबरो कमिटी हिंदुस्थानात आली. हिंदी पुढाऱ्यांनी स्वराज्याची (होमरूल) मागणी पुढे केली. डिप्रेस्ड क्लास मिशनचे श्री. वि. रा. शिंदे यांनी अस्पृश्यांच्या राजकीय मागण्यांबाबत असा सर्वत्र प्रचार सुरू केला की, ' अस्पृश्यांना स्वतंत्र प्रतिनिधीत्व न देता त्यांचे हितसंरक्षण उच्चवर्णीय हिंदू प्रतिनिधींच्या हाती सोपवावे,' चंदावरकर व शिंदे यांच्या ह्या मताविरूद्व डॉ. आंबेडकरांनी ' हे हिंदू लोक स्वत:च्या घरातील घाण साफ करून टाकायला अजून तयार नाहीत तर त्यांनी स्वराज्य का मागावे ' असे मतप्रदर्शन २६ जानेवारी १९१९ च्या टाईम्सच्या अंकात ' A Mahar on Home Rule ' या लेखात केले होते. त्यामुळे अस्पृश्यांची कैफियत अस्पृश्य प्रतिनिधीमार्फत साऊथबरो कमिटीसमोर मांडण्याची निकड निर्माण झाली.
डॉ. आंबेडकरांनी प्रयत्नपूर्वक साऊथबरो कमिटीसमोर अस्पृश्यांच्या राजकीय मागण्यांची कैफीयत सादर करण्याची संधी मिळवून घेतली. कमिटीसमोर शिंदे व डॉ. आंबेडकर यांनी अस्पृश्यांची मागणी भिन्न दृष्टिकोनातून मांडली.
शिंद्यांनी साऊथबरोकमिटीसमोर जी साक्ष दिली तिचा जर कमिटीने स्वीकार केला तर अस्पृश्य समाज आपल्या राजकीय हक्कांना मुकेल. कारण मतदानासाठी जी लायकी अस्पृश्यांसाठी शिंद्यांनी सुचविली होती ती अस्पृश्यातील मूठभर लोकांमध्येही सापडणार नाही आणि ती सापडलीच तर हे मूठभर लोक शिंद्यांच्या कच्छपी राहून शिंद्यांना किंवा त्यांच्या हस्तकांना निवडून देतील व अस्पृश्यांच्या खऱ्या प्रतिनिधींना निवडून येण्याचा संभव राहणार नाही. त्यामुळे सामाजिक, धार्मिक व आर्थिक. बाबतीत अस्पृश्यांना स्पृश्यांची जशी गुलामगिरी पत्करावी लागेल तशीच राजकीय बाबतीतही अस्पृश्यांना स्पृश्यांची गुलामगिरी पत्करावी लागेल. दुसऱ्या शब्दात वरिष्ठ हिंदू लोक अस्पृश्यांवर राष्ट्रीय