८२
चळवळीचा फायदा सर्वच अस्पृश्यांना झाला
शनिवार, तारीख २९ फेब्रुवारी १९३६ रोजी रात्रौ साडे नऊ वाजता श्री. राघोबा वनमाळी यांचे अध्यक्षतेखाली पनवेल तालुक्यातील चांभारांची एक सभा पनवेल येथे भरून तीत खालील ठराव पास करण्यात आले.-
ठराव १ ला.--बादशहा पंचम जॉर्ज यांचे निधनाबद्दल दुःख व नवे बादशाहा आठवे एडवर्ड यांचे अभिनंदन
ठराव २ रा.--डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचेवर पूर्ण विश्वास.
ठराव ३ रा.--मु. येवले, जिल्हा नाशिक येथील धर्मांतराचे ठरावास पाठिंबा.
या सभेस श्री. शिवतरकर, गवरूजी उरणकर, महादेव कल्याणकर, मारुती मोहोकर, महादेव महाडीक वगैरे वक्त्यांची भाषणे झाली. शेवटी अध्यक्षांनी डॉ. आंबेडकर व त्यांचे धर्मांतराचे धोरण या बाबतीत समारोपादाखल परिणामकारक असे भाषण केल्यावर सभा बरखास्त झाली.
पानसुपारी समारंभ
रविवार, तारीख १ मार्च १९३६ रोजी अस्पृश्य परिषदेचे काम आटोपल्यावर पनवेल येथील चांभार लोकांनी डॉ. आंबेडकरांना पानसुपारी आमंत्रण दिले. त्यावेळी त्यांना वेळ नव्हता तरी ते त्यांनी आनंदाने स्वीकारले. सदर प्रसंगी श्री. वनमाळी यांनी ग्रामस्थ लोकांच्या आग्रहावरून त्यांचेतफें छोटेसे भाषण
केले. त्यात त्यांनी सांगितले की,
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी येथील चांभार लोकांच्या आमंत्रणास मान देऊन आपल्या पुण्य दर्शनाचा लाभ त्यास दिला याबद्दल त्यांना फार आनंद होऊन ते आपले फार आभारी आहेत. या ठिकाणच्या चांभार महारात कोणत्याही प्रकारचा मतभेद नसून येथील चांभारांनी डॉक्टरांना येताना पुष्पहार घालून त्यांचे स्वागत केले. तसेच तेथे निघालेल्या मिरवणुकीच्या वेळी त्यांच्या फोटोस हार घालून त्यांच्यावरील आपले प्रेम व्यक्त केले. परिषदेच्या खुल्या अधिवेशनात स्त्री-पुरुषांनी खुल्या दिलाने भाग घेऊन धर्मांतराच्या ठरावास पाठिंबाही [दिला ] आहे. शिवाय काल रात्री येथे एक स्वतंत्र सभा भरवून त्यांच्यावरील विश्वास
जनता : ७ मार्च १९३६.