४६० डॉ. वाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
जाहीर करून धर्मातराबाबत स्वतंत्र ठराव करण्यात आला. आता आपणास आमची हीच विनंती आहे की, जसे आपण आपल्या समाजाच्या उन्नतीप्रित्यर्थ झटता तसे आमच्याकडेही विशेष लक्ष असू द्या. आमच्यातले काही लोक आपणास विरोध करतात. त्यांच्यावर आमचा विश्वास नाही. आपणच आमचे खरे पुढारी आहात.'' अशा आशयाचे श्री. वनमाळी यांचे भाषण झाल्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भाषण केले. त्यात ते म्हणाले,
आपण मला या ठिकाणी बोलावून माझा जो गौरव केला त्याबद्दल मी आपले प्रथम आभार मानतो. मला आता काही बोलावयाचे नव्हते, पण रा. वनमाळी . यांच्या भाषणात जो थोडा ध्वनी निधाला त्यावरून आपणास माझ्याबद्दल थोडी शंका आल्याचे मला वाटते, परंतु मी आपणास असे सांगतो की, माझी चळवळ अमुक एका वर्गाची किंवा अमुक एका जातीच्या उन्नतीकरता आहे असे नसून ती सर्व अस्पृश्यांच्या उञ्नतीकरला आहे. दुर्दैवाची किंवा सुदैवाची गोष्ट ही की, ती चळवळ एकट्या महार समाजाने चालविली आहे. इतर जातींनी जर ती हाती | घेतली तर मी महार जातीस सांगेन की, तुम्ही स्वस्थ बसा. आतापर्यंत जी चळवळ झाली तिचा फायदा एकट्या महार जातीला न होता चांभारांना व मांगानाही झाला आहे. शाळा खात्यात सुपरवायझर नेमा म्हणून आम्ही मुंबई म्युनिसीपालिटीस सांगितले. म्युनिसीपालिटीने सुपरवायझर नेमले ते चांभार व सध्या ते गृहस्थ हे माझ्या शेजारी बसले आहेत (मे. शिवतरकरांकडे बोट दाखवून). पोलीस ट्रेनिंग कॉलेजात अस्पृश्य लोक घ्यावे असे सरकारास सांगितले तेव्हा सरकारने घेतले त्यातही महार नसून चांभार व मांगच आहेत. या उदाहरणावरून माझी चळवळ महारांच्याच हिताची कशी हे मला समजत नाही, आता चालू चळवळीबद्दल थोडा खुलासा करतो. अस्पृश्यातील सर्व जातींनी धर्मांतर करावे अशी माझी इच्छा आहे, परंतु इतर जातींनी माझे न ऐकता त्या जर स्वस्थ बसल्या तर माझा नाईलाज आहे , परंतु ज्या जाती मागे राहातील त्यांची स्थिती फार केविलवाणी होईल हेही मी तुम्हास सांगून ठेवतो. कारण मग अस्पृश्यता निवारण्याचा लढा तुम्हास लढावा लागेल व ते फार कठीण काम होईल. कारण महारांची लोकसंख्या ८० टक्के आहे. हे इतके बहुसंख्य लोक तुमच्यातून निघून गेल्यावर बाकीचे लोक काय करू शकतील ? आजच इतक्या चळवळी करूनसुद्धा काही दाद लागत नाही तर पुढे काय लागणार ?: तेव्हा. तुम्ही बहुजन समाजाबरोबर धर्मातर करण्यातच तुमचे हित आहे. महार जातीकडून तुमच्याबाबतीत काही अन्याय झाला तर मला सांगा, मी त्याचा योग्य परामर्श घेईन.
७ ७ ७