| ८३ |
मत विकणे हा गुन्हा तर आहेच
शिवाय तो आत्मघातही आहे
ठाणे जिल्हा अस्पृश्य परिषदेचे पहिले अधिवेशन अखिल अस्पृश्य समाजाचे पुढारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली ठाणे जिल्ह्यातील पालघर नजीकच्या वेढी या गावी ता. २९ मार्च १९३६ रोजी होणार असल्यामुळे या परिषदेसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे श्री. कमलाकांत चित्रे, संभाजीराव गायकवाड, श्री. वाघ, श्री. मडकेबुवा जाधव, श्री. गायकवाड, श्री. अनंतराव चित्रे, श्री. शांताराम पोतनीस, श्री. चांगदेव ` मोहिते, श्री. बापुसाहेब सहस्त्रबुद्धे, श्री. रामचंद्र मोरे, श्री. केणी, जे..पी. वनमाळी मास्तर यांचेसह सकाळी वेढी गावास जाण्यास मुंबईहून निघाले. वसई स्टेशनवर चांभार समाजाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वागत करून पुष्पहार अर्पण करून त्यांचा जयजयकार केला. दुपारी ११ वाजता वेढी गावानजीकच्या सपाला गावाच्या स्टेशनवर उतरले. सपाला स्टेशनवर परिषदेसाठी मुंबईहून आलेल्या सर्व मंडळींचे ठाणे जिल्ह्यातील अस्पृश्य समाजाने मोठ्या आदराने स्वांगत करून डॉ. आंबेडकरांचे नावाने जयघोष केला |
सपाला स्टेशनपासून वेढी हे गावं अदमासे ३/४ मैल दूर आहे. तेथे मुंबईहून परिषदेस आलेल्या मंडळीस नेण्यासाठी मोटार लॉरीची व टांग्यांची १-२ दिवसापूर्वीच आगाऊ तजवीज ठाणे जिल्ह्यातील अस्पृश्य समाजाने करून ठेवून भाड्याचा बयाणाही वाहनवाल्यास आगाऊच देऊन ठेवला होता. परंतु ता. २८ मार्च १९३६ रोजी रात्री म्हणजे परिषदेच्या आदले दिवशी सपाला येथील वाहनवाले लोकांची बैठक स्पृश्य लोकांच्या चिथावणीवरून होऊन त्यांनी डॉ. आंबेडकर व त्यांच्या बरोबरच्या माणसांना आपले वाहनातून बसवून नेऊ नये म्हणून ठराव करून ठेविले. .. सपाला स्टेशनबाहेर डॉ. आंबेडकर व परिषदेकरिता आलेल्या मंडळीसह वाहनात बसण्यास आले. परंतु मोटारवाल्याने आपली मोटार नादुरुस्त असल्याचे सांगितले. दुसरी मोटार तर स्टेशनबाहेर नव्हतीच. तेव्हा सर्व मंडळी टांग्यात बसू लागली, परंतु टांगेवाल्यांनी अस्पृश्य मंडळींना आमच्या टांग्यात बसवून आम्ही नेणार नाही, आजपर्यंत आम्ही कधीही अस्पृश्य माणसांना आमच्या टांग्यात बसविले नाही व तुमचे भाडे न करण्याचा आमचा संप आहे असे स्पष्ट सांगितले.. टांगेवाल्यांची ही संपाची भाषा ऐकून सर्व मंडळी पायानेच वेढी गावी जाण्याचा विचार करू लागली. इतक्यात संपात सामील असलेला एक मुसलमान टांगेवाला संपातून फुटून निघाला व आपण भाडे
जनता : ४ एप्रिल १९३६