मत विकणे हा गुन्हा तर ... ... . तो आत्मघातही आहे ४६३
तुम्ही आज अपंग स्थितीत आहात. तुम्ही अशिक्षित व दरिद्री आहात व तुम्हास कोणत्याही प्रकारचे सामर्थ्य नाही, या गोष्टीस पुरावा नको. ज्या खेडेगावात तुम्ही राहंता, त्यात तुमची वस्ती व इतर लोकांची वस्ती याची तुलना केली तर तुम्हास समजेल की तुमची स्थिती निकृष्ट आहे. पशुपक्षी व जनावरे, निसर्गाने दिलेल्या गोष्टीवर समाधान मानून राहतात. निसर्गाने पृथ्वीवर ज्या वस्तू उत्पन्न केलेल्या आहेत त्यावर त्यांचे जीवन अवलंबून असते, पण मनुष्याची वासना व महत्त्वाकांक्षा आपणास निसर्गाकडून मिळाले, त्यापेक्षाही काही जास्त मिळावे अशी असते. अशी इच्छा सर्व मानवी समाजाची असते की, आपली वाढ व्हावी. त्याप्रमाणेच आपलीही इच्छा आहे की, आपलीही सर्वांगीण उन्नती व वाढ व्हावी. तुम्ही ज्या दारिद्र्यात आहात ती परिस्थिती बदलवून, तुम्हास पुढे जावयाचे आहे. तुम्ही आपले पायावर उभे राहू शकाल काय ? याचा विचार करा. मी जो आज तुमच्या स्थितीचा अभ्यास केला आहे, त्यावरून माझी अशी खात्री झाली आहे की, तुम्हास कोणाचे तरी सहाय्य घेतले पाहिजे. आज तुमच्यात फारसे शिक्षित लोक नाहीत. त्याकरिता तुम्हास शिक्षण घेतले पाहिजे व तेही उच्च दर्जाचे शिक्षण घेतले पाहिजे. एक काळ असा होता की चार पुस्तके शिकलेला स्पृश्य माणूस मामलेदार होत असे, पण आज तो काळ बदलला आहे. आज उच्च शिक्षण घेतल्याखेरीज कोणासही सरकारी नोकऱ्या मिळू शकंत नाहीत. तुम्हास आज अन्न खाण्यास नाही, ते तुम्ही लोक आपल्या मुलांना बी.ए., एम.ए. कसे करू शकाल ? तुमच्यामध्ये असा कोणीही माणूस नाही की तो आपल्या ऐपतीवर मुलास सुशिक्षित करील. याकरिता जो समाज तुम्हास शिक्षणाचे बाबतीत तुमच्याकडून कोणतीही अपेक्षा न करिता जर तुमचा स्वाभिमान सांभाळून मदत देईल तर अशा समाजाशी तुम्ही सहकार्य करून स्पृश्य हिंदुंच्या स्पर्धेत अग्रेसरत्व मिळविले पाहिजे
आज आपले पुष्कळ लोक काबाडकष्ट करून पोट भरतात. त्यांनी जर
काबाडकष्ट केले, रोजगार धंदा केला तरच त्यांना पोटभर अन्न व अंगभर वस्त्र कसेतरी मिळू शकते. आपणास आज जो रोजगार धंदा मिळतो तो स्पृश्य लोकांकडूंन मोठ्या मिनतवारीने मिळतो. तुम्हास स्वतंत्र धंदा नाही, स्वतंत्र शेती नाही, स्वतंत्र व्यापार नाही व त्याची साधनेही नाहीत व स्वतंत्र साधने उत्पन्न करण्याची तुम्हास ऐपत नाही व ऐपत असली तर संधी नाही, संरकारने कायदा करून आपणास सरकारच्या ताब्यातील सार्वजनिक पाणवठ्यावर पाणी भरण्याचा इक्क दिला आहे पण आपणास असा अनुभव आहे की, स्पृश्य लोक त्या पाणवठ्यावर आपणास मुळीच पाणी भरू देत नाहीत. जर आपण त्या पाणवठ्यावर पाणी भरले तर स्पृश्य लोक तुमच्यावर बहिष्कार टाकतात. त्यावेळी तुमचे अत्यंत हाल होतात. त्या हालाच्या, छळणुकीच्या व संकटाच्या वेळी,