४६४ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
त्याच गावचे मुसलमानही तुम्हास बहिष्कारातून, संकटातून आणि छळणुकीतून तुमची सोडवणूक करण्यास मदतीला येत नाहीत. त्यावेळी धीराने आपण संकटे सोशीत राहतो. त्या संकटग्रस्तप्रसंगी आपली स्थिती असहाय होते. अशावेळी आपण ज्या स्थितीत असतो त्यावेळी आपणास काही करता येत नाही. त्याकरिता आपणास आजच्या स्थितीत दुसऱ्याचे सहाय्य घेणे जरूर आहे. |
आज ज्या त्या हिंदू समाजातील जाती आपस्वार्थी बनून आपआपल्या जातीस मदत करीत आहेत; पण ह्या हिंदू स्पृश्य जाती आपल्या अस्पृश्य समाजाला मदत करीत नाहीत. कारण त्या स्पृश्य हिंदू जातीचे लोकांचे व आपले लागेबांधे नाहीत. त्याकरिता आपणास जे मदत करतील व आपल्या असहाय स्थितीत संरक्षण करतील, त्यांचे बरोबर क्रणानुबंध जोडून घेतला पाहिजे. आज आपण हिंदू समाजाचे सर्व देव धर्म पाळीत आहोत, तरीही पण आपली हिंदुधर्मीय स्पृश्यांकडून उपेक्षा झालेली आहे. हिंदुधर्मीय आपणाकरिता काहीही करू शकत नाहीत. नुकताच महात्मा गांधींनी हरिजनात लेख लिहिला आहे. त्यांच्याकडे अस्पृश्य वर्गाच्या काही विद्यार्थ्यांनी आपणास विद्यार्जनाच्या बाबतीतल्या अडचणीतून काढण्यासाठी अर्ज केले होते व स्कॉलरशिपांची मागणी केलेली होती. त्या अर्जास महात्माजींनी उत्तर दिले आहे की, जर सवलती मिळविण्यासाठीच तुम्हास हिंदू धर्मात राहावयाचे असेल, तर तुम्ही हिंदू धर्म सोडून गेला तरी चालेलं. महात्माजीसारख्यांची ही भावना झाली. मग इतर सामान्य लोकांची कशा प्रकारची असू शकेल ? |
यावरून व अनेक गोष्टीवरून हिंदू धर्माच्या लोकांकडे आशा ठेवून राहणे चूक होईल. तुम्हास तुमची उन्नती व प्रगती करून घेणे असेल तर तुम्हास सहृदय व सामर्थ्यवान, शीलसंपन्न, निस्वार्थी अशा समाजाशी लागाबांधा जोडला पाहिजे आणि असा लागाबांधा दुसरे समाजाशी जोडून घेणे याचाच अर्थ
धर्मांतर
मुसलमान, खिस्ती व शीख हे आपणासाठी कोट्यावधी रुपये खर्च करण्यास तयार आहेत. तर त्यांच्याउलट हिंदुधर्मीयांची प्रवृत्ती कशी आहे ते पहा. . महात्मा गांधींनी स्वराज्य संपादनासाठी ज्यावेळी हिंदू समाजाकडे मदतीची याचना केली त्यावेळी त्यांना कोट सवा कोट, रुपये मिळू शकले, पण त्यांनी ज्यावेळी अस्पृश्यांच्यासाठी हिंदू समाजाकडे पैशाची मागणी केली त्यावेळी त्यांना अखिल हिंदुस्थानात, मोठ्या मिनतवारीने आठ लाख रुपये मिळाले. त्यापैकी चार लाख रुपये दोन वर्षांत खर्चून टाकले गेले व राहिलेले चार लाखही या वर्षा सहा महिन्यात कसे तरी खर्च होणार असे समजते. यावरून हिंदू समाज स्वराज्याकरिता किती स्वार्थत्याग करण्यास तयार आहे व अस्पृश्योद्धारासाठी किती स्वार्थत्याग करण्यास तयार आहे हे स्पष्टपणे दिसून
येते