२९-२३-१९३६ मत विकणे हा गुन्हा तर आहेच शिवाय तो आत्मघातही आहे - Page 509

मत विकणे हा गुन्हा तर ...... तो आत्मघातही आहे ४६५

मुसलमानांच्या एका सभेने एक कोटी रुपये जमवावेत व आपल्याकरिता खर्च

करावेत असा विचार केला, तर शीख समाजाने लाखो रुपये जमवून तुमचे

उन्नतीसाठी खर्च करण्याचा निर्धार केलेला आहे. याच्याउलट हिंदू समाज

स्वस्थ डोळे झाकून बसला आहे. डोळ्यावर बळेच कातडे ओढून बसलेल्या या

हिंदू समाजाकडून तुम्हास मदत तर नाहीच पण तो समाज तुमच्या प्रगतीच्या

मार्गात अडथळे उत्पन्न करीत आहे. त्यामुळे तुमचा त्यांचेकडून उद्धार होणार

नाही. आजच्या प्रगतीच्या काळात आपण आपला मार्ग हिंदू धर्माचे लोकांपासून

अलग स्वतंत्रपणे चोखाळला पाहिजे. स्वाभिमानाला व सन्मानाला धक्का न देता,

जे आपल्या प्रगतीला समतेने मदत करतील अशा समाजाशी आपण सहकार्य केले

पाहिजे.

पूर्वजांचा धर्म उराशी कवटाळून बसण्यात काय अर्थ आहे? खोट्या

अभिमानाचा आपण त्याग केला पाहिजे. हिंदू धर्मात चातुर्वर्ण्याची घातक प्रथा

आहे व ती मोडण्याची चिन्हेही दिसत नाहीत. या चातुर्वर्ण्याने व वर्णाश्रमधर्माने

आपले अत्यंत नुकसान केलेले आहे. वर्णाश्रमधर्म व्यवस्थेमुळे, ब्राह्मणाशिवाय

इतर कोणीही विद्या संपादन करू नये, क्षत्रियांशिवाय कोणी शस्त्र धारण करू

नये. अशा वर्णव्यवस्थेमुळे आपले पूर्वजास अज्ञानी व निर्बल करण्यात आले

होते. या वर्णाश्रमधर्माने आपणास ज्ञान, सत्ता, शस्त्र व संपत्ती याचा उपयोग

घेऊ दिलेला नाही. या वर्णाश्रमधर्माने आपल्या पूर्वजांची प्रतिकारशक्ती नाहीशी

केली, त्याचे प्रगतीपर मार्गावर पाऊलच पडू दिले नाही. आज आपली तशी

स्थिती नाही. हल्ली सर्वास शिक्षणाचा मार्ग खुला आहे. शस्त्रधारणाची वाट

मोकळी आहे. प्रगतीचा मार्ग खुला आहे. अशा स्थितीत, पूर्वजांच्या धर्माला

आजही तुम्ही कवटाळून बसलात, तर तुमची कधीच उन्नती होणार नाही. तुम्ही

ज्ञान व शक्ती संपादन करून व खोट्या रूढीची बंधने तोडून, धडाडीने स्वोन्नतीचा

मार्ग चोखाळा, हे मी तुम्हास निक्षून सांगत आहे. याचा खोलबुद्धीने व शांत-

चित्ताने विचार करा व प्रगतीच्या मार्गावर पाऊले टाकून उज्ज्वलतेचा रस्ता धरा,

आता राजकारणासंबंधी दुसरा प्रश्‍न आहे. एका वर्षानंतर मुंबई इलाख्यात व हिंदुस्थानात नवी राज्यघटना निर्माण होणार आहे. त्या राज्यघटनेसंबंधी तुमचे कर्तव्य काय आहे, हे दाखवून देण्याची माझी इच्छा आहे. आजपर्यंत तुमची अशी दृष्टी असे की, आपणास ज्या अडचणी येतील त्या नाहीशा होण्यासाठी सरकारी अधिकाऱ्याकडे अर्ज करावयाचे. या अर्जापासून तुमची संकटे दूर होतील, अशी तुमची कल्पनाही होती. कलेक्टर हा राजा आहे, अशी तुमची भावना. कलेक्टर हा एका दृष्टीने राजा होता. कारण आजकाल नोकरशाहीची सत्ता आहे, पण ही परिस्थिती पुढल्या वर्षापासून पालटली जाणार आहे. एक वर्षानंतर राजकारणात, नोकरशाहीस स्वतंत्र स्थान व सत्ता राहणार नाही. नवीन