४६६ डॉ. वावासाहेव आंवेडकर लेखन आणि भाषणे
राज्यघटनेप्रमाणे सर्व अधिकार कायदेमंडळाकडे जातील व कायदेमंडळाच्या हुकमतीखाली कलेवटरांना व मामलेदारांना मान वाकवून वागावे लागेल. म्हणजे कायदेमंडळ हे पुढे महत्त्वाचे स्थान होणार. त्या कायदेमंडळात आपल्याला महत्व प्राप्त झालेले आहे. राजकारणाचे भवितव्य कायदेमंडळावर अवलंबून आहे. याकरिता कायदेमंडळावर चांगली माणसे गेली पाहिजेत. शेठ, सावकार, पैसेवाले कायदेमंडळावर डोळे ठेवून आहेत. या लोकांकडून गरीब जनतेचे मुळीच कल्याण होणार नाही. याकरिता, गोरगरिबांमध्ये मिळून मिसळून काम करणाऱ्या, गोरगरिबांच्या आकांक्षांची जाणीव असलेल्या निस्वार्थी, निर्भीड लायक व मतदारांशी इमानीपणानी वागणाऱ्या गोरगरिबांच्या प्रतिनिधींची आपणास निवड केली पाहिजे. आपल्या खराखुऱ्या हितचिंतकांना जर आपण कायदेमंडळावर निवडून दिले, तरच आपले पाऊल पुढे पडेल व आपले हितवर्धन होईल.
कायदेमंडळावर निवडून देण्यासाठी आपणास मताचा अधिकार आहे. हा अधिकार फार महत्त्वाचा व मोठा आहे. तेव्हा आपली मतदानाची बहुमोल शक्ती भलत्याच ठिकाणी वाया जाता उपयोगी नाही. आपले खरे कळकळीचे व इमानी हितचिंतक कोण आहेत हे मी आपणास वेळेवर सांगेन, त्यांनाच तुम्ही मतदान करा.
सध्या आघल्या देशात सधन लोक मते विकत घेतात, पण मते ही विकण्याची वस्तू नाही. ती आपले संरक्षणाची साधनशक्ती आहे. मते विकणे हा गुन्हा तर आहेच शिवाय तो आत्मघातही आहे. मते विकून नालायकांची खोगीरभरती कायदेमंडळावर केल्याने देशाचे अपरिमित नुकसान होऊन राष्ट्र अधोगतीस जाते. स्वतः नालायक व अपात्र असून पैशाचे जोरावर कायदेमंडळावर जाऊ इच्छिणारे काही लोक तुम्हास द्रव्याचे आमिष दाखवतील, दारिद्र्यामुळे तुम्हास मते विकावी की काय असा मोह उत्पन्न होईल. अशा कोणत्याही मोहास तुम्ही बिलकूल बळी पडू नका. मोहास बळी पडलात तर तुम्ही आपल्या पायावर पर्यायाने समाजाच्या पायावर धोंडा पाडून घ्याल ही धोक्याची सूचना मी आज सर्वाना देत आहे. मते विकत मागणाऱ्या माणसाला समाजाचा पाठिंबा नसतो म्हणून तर तो द्रव्याच्या बळावर आपली लांयकी प्रस्थापित करण्याचा अट्टाहास करतो. अशा नालायक माणसाकडून समाजहिताची अगर राष्ट्रहिताची कार्ये होत नाहीत. पैसेवाला जर कायदेमंडळात सभासद म्हणून गेला, तर तो द्रव्यवाल्या लोकांचेच हितसंरक्षण करील व तो आपल्यासारख्या गोरगरिबांच्या हिताच्या आड येईल. म्हणून मत विकण्याचे पाप तुम्ही करू नका अ तसे तुम्ही करणार नाही अशी माझी खात्री आहे. पेसेवाल्यांच्या कसल्याही प्रकारच्या आमिषाला व भुलभुलावणीला गोडीगुलाबीच्या मायावी भाषणाला आणि पैशाला तुम्ही बळी पडू नका व आपली .दिशाभूल करून घेऊ नका