८८
आपल्या मातीमोल आयुष्याला
सोन्याचे दिवस प्राप्त होण्यासाठीच
धर्मांतराची आवश्यकता आहे
कल्याण येथे तारीख १७ मे १९३६ रविवार रोजी धर्मांतराच्या जाहीर घोषणेस पाठिंबा देण्याकरिता ठाणे जिल्ह्यातील पूर्व व दक्षिण भागातील अस्पृश्य मानलेल्या समाजाची जंगी जाहीर परिषद डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली यशस्वीरीतीने पार पडली. परिषदेचे नियोजित अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे मुंबईहून येणार असल्याची बातमी आगाऊ हस्तपत्रकांच्याद्वारे प्रसिद्ध झाल्यामुळे मोठ्या उत्सुकतेने कल्याण स्टेशनवर त्यांचे हार्दिक स्वागत करण्याकरिता सुमारे शे-दीडशे खेड्यातून आलेला तीन चार हजार अस्पृश्य समुदाय स्टेशनबाहेर गाडीची चातकाप्रमाणे वाट पाहात उभा होता. दुपारी ३ वाजता कल्याण स्टेशनवर डॉक्टरसाहेब उतरताच येथील प्रमुख कार्यकर्त्या मंडळींतफे स्टेशनवर पुष्पहार अर्पण करून त्यांचे स्वागत करण्यात आले.
स्टेशनच्या बाहेर येताच ' डॉ. आंबेडकर की जय ' ' आंबेडकर जिंदाबाद, थोडे दिनमै भीमराज ' इत्यादी गगनभेदी घोषणांनी तेथील सर्व वातावरण दुमदुमून गेले होते. डॉ. साहेबांचे, दर्शनोत्सुक असलेल्या समाजास दर्शन झाल्यावर सर्वांची अंतःकरणे आनंदित होऊन जिकडे तिकडे नवचैतन्य उत्पन्न झाले होते. नंतर चार हजार लोकांच्या समवेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची शहराच्या प्रमुख भागातून जंगी मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीच्या दोन्ही बाजूंनी स्वयंसेवकांची पथके शिस्तीने डॉ. बाबासाहेबांचा जयघोष करीत चालली होती. मिरवणुकीच्या पुढे बँड, वाजंत्री इत्यादि वाद्ये वाजत होती. मधून-मधून लाठीकाठीचे खेळ निरनिराळ्या तालमी करीत होत्या. त्यावेळचा तो देखावा पाहाणाऱ्यास मूक जनतेच्या निस्सीम प्रेमाला आणि स्वाभिमानाला पाहून कोणालाही धन्यताच वाटली असेल.
या परिषदेमध्ये डॉ. साहेबांनी भाषण करताना ' धर्मांतर ' घोषणेसंबंधी खुलासा केला, ते आपल्या भाषणात. म्हणाले
आज आपण मुख्यत: धर्मांतरासंबंधी मी काय सांगणार आहे हे ऐकण्याकरता
आला आहात. त्याबद्दल मला खुलासेवार सांगणे प्राप्त आहे. काही लोक धर्मातरासंबंधी असा प्रश्न करतात की आम्ही धर्मातर का करावे ? परंतु याला
माडा उलटं उत सा आडि की; आही मात की काळा 1 मी भात
जनता : २३ मे, १९३६.