आपल्या मातीमोल आयुष्याला . . . . . . आवश्यकता आहे ४७९
सर्व जण मुले पाहून स्टेशन मास्तर आमच्याजवळ येऊन आम्हास कुठे जायचे, तुम्ही कोण वगैरे विचारू लागला. आम्ही ' महार ' असे म्हणताच स्टेशन मास्तरला धक्का बसल्यासारखा झाला. तो दचकून पाच-सहा कदम मागे हटून गेला. तरीपण आमच्या पोशाखावरून आम्ही कोणीतरी सुखवस्तू महाराची मुले आहोत, हे त्यांनी जाणले व आम्हाला गाडी करून देण्याचे ठरविले. परंतु संध्याकाळी सहा-सात वाजेपर्यंत एकही गाडीवान आम्हाला-आम्ही महाराची मुले म्हणून-घेऊन जायला तयार होईना. शेवटी एक गाडीवान तयार झाला. परंतु त्याने अशी अट घातली की आपण काही गाडी चालविणार नाही. मी पलटणीत दिवस काढल्यामुळे मला गाडी हाकणे कठीण वाटले नाही. आम्ही कबूली देताच गाडीवान गाडी घेऊन आला व आम्ही गोरेगावच्या मार्गाला लागलो. गावच्या बाहेर बरेच दूर गेल्यावर आम्हाला एक नाला लागला. ' येथेच तुम्ही भाकरी खाऊन घ्या. पुढे तुम्हाला पाणी प्यायला मिळणार नाही ' असे गाडीवानाने सांगितले. आम्ही खाली उतरलो. भाकरी खाल्ल्या. नाल्याचे पाणी इतके अस्वच्छ होते को त्यात बऱ्याच प्रमाणात शेणाचे मिश्रण होते. गाडीवान तेवढ्यात कुठे तरी भाकरी खाऊन आला. पुन्हा आमची गाडी चालू झाली. रात्र बरीच झाली तेव्हा गाडीवान हळूच गाडीत येऊन बसला. रस्त्यावर दिवा नाही, माणूस तर कोणी दिसेना. आम्हाला रडू कोसळले. अशारीतीने आम्ही रात्री बारा वाजेपर्यंत वेळ काढली. मनात तक-कुतर्क चालू होतेच. आपण काही गोरेगावास जात नाही, असे वाटले. इतक्यात एका टोल नाक्यावर आमची गाडी येताच आम्ही गाडीतून उड्याच घेतल्या, भाकरी खाण्याकरिता टोल नाक्यावरील मनुष्यास विचारले. मला पर्शियन भाषा चांगली येत असल्यामुळे त्या मनुष्याशी बोलण्यास अडचण पडली नाही. परंतु त्याने मला उर्मटपणाने उत्तर देऊन पाण्यासाठी समोरचा डोंगर दाखविला. शेवटी कशीतरी ती रात्र टोल नाक्यावर काढली. सकाळी पुन्हा गाडी चालू केली व शेवटी दुपारी अर्धमेल्या अवस्थेत गोरेगावी येऊन पोहोचलो.
माझ्या आयुष्यातील तिसरा प्रसंग म्हटला म्हणजे बडोदे सरकारची नोकरी. बडोदे सरकारची स्कॉलरशिप मिळाल्यावर मी विलायतेला जाऊन उच्च शिक्षण घेतले. तेथून परत आल्यावर स्कॉलरशिपच्या अटीप्रमाणे मला बडोदे संस्थानात नोकरी करणे भाग होते. परंतु बडोद्यात मला राहावयास एकही घर मिळेना. हिंदू किंवा मुसलमान कोणीच राहावयास जागा देईना. शेवटी एका पारशी धर्मशाळेत पार्शी म्हणून राहण्याचे ठरविले. विलायतेहून परत आल्यावर मी दिसायला रुबाबदार व गोरा दिसत होतो. शेवटी मी एदलजी सोराबजी असे पार्शी नाव धारण करून राहिलो. परंतु रोजी दोन रुपये घेऊन राहावयास [जागा ] देण्याचे धर्मशाळेच्या रखवालदाराने कबूल [केले. ] यापूर्वीच श्रीमंत महाराज सरकारने बडोद्यास एक शिकलेले महाराचे [पोर ] आणले [आहे, ] ही कुणकुण