३०-५-१९३६ ते १-६-१९३६ मुक्ती कोन पथे ? - Page 527

मुक्ती कोन पथे? ४८३

बांधवांना खेड्यापाड्यातून अनेक प्रकारचे हाल सोसावे लागले आणि हल्ली लागत आहेत. तरी आपणास जर मनुष्य म्हणून जगावयाचे असेल व आपली सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक व राजकीय परिस्थिती सुधारून आपले माणुसकीचे ` हक्क प्रस्थापित करावयाचे असतील तर आपण या हिंदू धर्मापासून अलग झाले पाहिजे. म्हणजे धर्मातर केले पाहिजे आणि त्यातच आपणा सर्व अस्पृश्यांचे कल्याण आहे. |

अस्पृश्यांच्या धर्मांतराचा प्रश्‍न हा अत्यंत महत्वाचा आहे. या प्रश्‍नाच्या बाबतीत अस्पृश्य जनतेचे धोरण निश्‍चित करणे हे अस्पृश्य जनतेचे कर्तव्य आहे, नव्हे जबाबदारी आहे. अस्पृश्यातील निरनिराळ्या जातींच्या निरनिराळ्या परिषदा भरवून त्यात या प्रश्‍नाचा खल करणे हा अस्पृश्य जनतेचे धोरण अजमावण्याचा मार्ग आहे, असे डॉ. बाबासाहेबांचे मत आहे.

वरील सूचनेनुसार, मुंबई इलाख्यातील सर्व महार बंधुभगिनीस विन॑तीपूर्वक कळविण्यात येते की, मुंबई इलाख्यातील सर्व महारांची प्रातिनिधीक स्वरूपाची परिषद मुंबई शहरामध्ये येत्या मे महिन्यात भरविण्याचे मुक्रर केले आहे. परिषदेमध्ये आपले परमपूज्य पुढारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्मांतराची जी घोषणा केली आहे त्याबाबतीत आपल्या समाजाचे पुढील धोरण निश्चित ठरविले जाईल. तरी या महत्त्वाच्या परिषदेमध्ये प्रत्येक जिल्ह्याजिल्ह्यातून, तालुक्यातालुक्यातून, व प्रत्येक गावागावातून आपापले प्रतिनिधी पाठवून परिषद यशस्वी कराल अशी आशा आहे.

आपले कार्य अतिशय मोठे व महत्त्वाचे असल्यामुळे, या कार्यास पैशाची व मनुष्यांची फार जरूरी आहे तरी मुंबई शहरवासीयास व इलाख्यातील अखिल महार बंधुभगिनीस आग्रहाची व अगत्याची विनंती करण्यात येते की, त्यांनी आपआपसातील वैयक्तिक मतभेद बाजूस ठेवून व एकदिलाने या परिषदेमध्ये भाग घेऊन ही परिषद यशस्वी करावी.

विशेष सूचना.--परिषदेकरिता वर्गणी किंवा देणगी देणे असल्यास अगर काही सूचना किंवा इतर पत्रव्यवहार खालील पत्त्यावर करणे.

जॉईंट सेक्रेटरीज :--अखिल मुंबई इलाखा महार परिषद, दामोदर हॉल, परळ,

मुंबई नं. १२. .

ता. क. छापील पावती घेतल्याशिवाय आपली वर्गणी देऊ नये.

आपले नम्र,

अध्यक्ष :-रेवजी दगडूजी डोळस. उपाध्यक्ष :-संभाजी तुकाराम गायकवाड.

जॉ. सेक्रेटरीज :-दिवाकर नेवजी पगारे, मारुती विठ्ठल घमरे, चांगदेव नारायण

| मोहिते. |

खजिनदार :-सुभेदार विश्राम गंगाराम सवादकर. " "

१ जनता : २९ फेब्रुवारी १९३६.