४८४ डॉ. वावासाहेव आंबेडकर लेखन आणि भाषणे
वरील भूमिकेला अनुसरुन महार परिषद, संत समाज परिषद व मातंग परिषद आयोजित करण्यात आल्या होत्या. आयोजकांनी आपापल्या कार्यक्रमांची वेगवेगळी पत्रके काढली होती. ती खालीलप्रमाणे आहेत.
'' अखिल मुंबई इलाखा महार परिषद, मुंबई
अध्यक्ष : - मे. बी. एस. व्यंकटराव उफ हैद्राबादी आंबेडकर.
शनिवार, रविवार व सोमवार ता. ३०-३१ मे, १ जून १९३६.
जागा : - कामगार मैदान, परेल, मुंबई नं. १२.
पूर्वी जाहीर केल्याप्रमाणे अखिल मुंबई इलाखा महार परिषदेचा एकंदर कार्यक्रम पुढील अंकी देण्यात येईल. या परिषदेमध्ये धर्मातरासंबंधी आपल्या मुंबई इलाख्यातील महार समाजाचे पुढील धोरण निश्चित केले जाणार आहे. तद्वत महार समाजाचे हिताच्या सर्व बाबींचा पूर्णपणे विचारविनिमय होणार असून पुढील कार्याची रूपरेषा आखण्यात येणार आहे.
सदर परिषद भावी इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिली जाणार आहे. करिता प्रत्येक महार बंधुभगिनोंनी या परिषदेस अवश्य हजर राहून आपली सक्रीय सहानुभूती दाखवावी. ही परिषद प्रातिनिधीक स्वरूपाची व्हावी अशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची इच्छा आहे. तरी ठिकठिकाणच्या महार समाजाने आपापले प्रतिनिधी त्वरित निश्चित करून त्यांची नावे, पत्ते, तसेच बाहेरगावच्या मंडळीने आपली वर्गणी, परिषदेसंबंधी काही सूचना, ठराव वगैरे खालील पत्यावर पत्रव्यवहार करणे अगर समक्ष भेटणे.
वि. सू.-बाहेरगावाहून येणाऱ्या प्रतिनिधीकरिता राहाण्याची व जेवणाची व्यवस्था स्वागत मंडळाने केली आहे. भोजनाची व राहाण्याची परिषदेच्या तिन्ही दिवसांची मिळून १ रु. फी ठेवलेली आहे. ज्यांना या सोयीचा फायदा घ्यावयाचा असेल त्यांनी खालील पत्त्यावर ता. २८-५-१९३६ पर्यंत आपआपली नावे नोंदविण्याची व्यवस्था करावी.
परिषदेसाठी पुढीलप्रमाणे वर्गणी ठेविली आहे
(१) स्वागत मंडळाचे सभासद रु. ५, (२) सहकारी सभासद रु. ३, (३) बाहेरगावच्या मंडळीला स्वागत मंडळाच्या सभासदत्वाची रु. ३, (४) साधारण सहकारी सभासद रु. २, (५) सर्वसाधारण सभासद रु. १, (६) फक्त स्त्रियांकरिता ८ आणे.