a
मुक्ती कोन पथे ?
मुंबई इलाखा महार परिषदेच्या मंडपातील कार्यक्रम
शनिवार ता. ३० मे-सायंकाळी ४ ते ५-३०-अध्यक्षांची मिरवणूक, राजगृहापासून सभा मंडपापर्यत, ५-३० ते ६ वाजेपर्यंत-स्वयंसेवकांतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि अध्यक्ष यांना सलामी. ६ ते ९ वाजेपर्यंत-(१) स्वागतापर पदे, (२) स्वागताध्यक्ष यांचे भाषण, (३) अध्यक्षांचे भाषण. रात्रौ ९-१५ ते १०-३०-भोजनाकरिता सुटी. १०-३० ते ११-३०-विषय नियामक कमिटीची सभा, ११-४५-पासून करमणुकीचे निरनिराळे
कार्यक्रम.
रविवार ता. ३१ मे-सकाळी ८ ते ११-१) स्वागतापर पदे (२) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण. ११ ते २-भोजन व विश्रांती. दुपारी २ ते ४-विषय नियामक कमिटीची सभा. सायंकाळी ५ ते ८-३०-ठराव वगैरे. रात्रौ ९ वाजल्यापासून मनोरंजक कार्यक्रम, अध्यक्षांचे आभार आणि परिषद विसर्जन.
सोमवार ता. १-६-३६ रोजी-डॉ. बाबासाहेबांचे अध्यक्षतेखाली सकाळी ८ ते ११-३० संत समाजाची परिषद. सायंकाळी ५ ते ८-३० राजकीय परिषद. रात्रौ ९ वाजता श्री. रेवजी दगडूजी डोळस यांना मुंबई शहरवासीय अस्पृश्य समाजातफे मानपत्र व महार परिषदेस उत्तम तऱहेने मदत केलेल्या मंडळीस पारितोषिके आणि आभार मानणे व अध्यक्षांचे भाषण आणि परिषद विसर्जन.
आपले नम्न
स्वागताध्यक्षः-रेवजी दगडूजी डोळस
उपाध्यक्षः-संभाजी तुकाराम गायकवाड
जॉ. सेक्रेटरीज :-दिवाकर नेवजी पगारे,
मारुती विठ्ठल घमरे, चांगदेव ना. मोहिते
खजिनदार :-सु. विश्राम गंगाराम सवादकर
पैसे व पत्रे वगैरे पाठविण्याचा पत्ता
जॉ. से. श्री. दिवाकर नेवजी पगारे,
अखिल मुंबई इलाखा महार परिषद, दामोदर हॉल,
परळ, मुंबई नं. १२." १
१ जनता : १६ मे १९३६.