३०-५-१९३६ ते १-६-१९३६ मुक्ती कोन पथे ? - Page 530

४८६ डॉ. वावासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

'' मुंबई इलाखा संत समाजाची परिषद

अध्यक्ष-डॉ. बाबासाहेब आंबेडकर

सोमवार, ता. १ जून १९३६ रोजी

ठिकाण-महार परिषदेचा मंडप

धर्मांतराच्या प्रश्‍नाबाबत संत समाजातर्फे विचारविनिमय करण्यात येईल.

परिषदेविषयी सविस्तर माहिती देणारी जाहीर पत्रके रवाना होत आहेत, तरी सर्व संत, साधु, नाथ, . बैरागी वगैरे मंडळींनी या परिषदेत भाग घ्यावा. पत्रव्यवहार पुढील पत्त्यावर करणे.--

पत्ता :- उपाध्यक्ष, तारकनाथ विठ्ठलनाथ.

फोरास रोड, Afe चाळ नं. ६, मुंबई नं. ८.

स्वागताध्यक्ष :-महंत शंकरदास नारायणदास बर्वे.

ज. सेक्रेटरी :-काशिनाथ तुळशीनाथ महंत.

मुंबई इलाखा मातंग परिषद

अध्यक्ष-मे. लक्ष्मणराव बाबाजी भिंगारदेवे बी. ए. (ऑनर्स)

मंगळवार, ता. २ जून १९३६ रोजी

ठिकाण -महार परिषदेचा मंडप, नायगाव, मुंबई

या परिषदेत 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर' यांनी केलेल्या 'धर्मांतरा' च्या प्रश्नाबाबत निर्णयात्मक चर्चा होईल. |

परिषदेविषयी सविस्तर माहिती जाहीर पत्रकाच्याद्वारे आमच्या मातंग बांधवांना करून देण्यात येईल. विशेष चौकशीकरिता खालील पत्त्यावर पत्रव्यवहार करावा.----

स्वागताध्यक्ष :-विष्णू केशव वेताळजे.

पत्ता - जनरल सेक्रेटरी डी. सी. वायदंडे

मुंबई इलाखा मातंग परिषद, नायगाव,

बी. डी. चाळ नं. ४, बी. प्लॉट, १ मजला,

खो. नं. २६, दादर-मुंबई.'' १

* जनता : ३० मे १९३६.