मुक्ती कोन पथे ? ४८७
'* अखिल मुंबई इलाखा महार परिषद, मुंबई
अपूर्व व यशस्वी अधिवेशन
सामुदायिक धर्मातरास पाठिंबा
मुंबई इलाखां महारं परिषदेचे अधिवेशन ता. ३० मे १९३६ रोजी हैद्राबाद संस्थानातील प्रख्यात पुढारी श्री. बी. एस. व्यंकटराव यांचे अध्यक्षतेखाली मोठ्या थाटाने सुरू झाले. या परिषदेसाठी ५० हजारावर लोक प्रशंस्तपणे बसू शकतील असा प्रचंड शोभिवंत मंडप दादर-नायगाव नाक्यावरील विस्तीर्ण मैदानावर उभारण्यात आला होता. या विस्तीर्ण मंडपास महाड दरवाजा, नाशिक दरवाजा व रमाबाई आंबेडकर दरवाजा असे तीन विशाल दरवाजे करण्यात आले होते व मंडपास ' रमाबाई नगर ' असे नाव देण्यात आले होते. मंडपाचे आत खालीलप्रमाणे उद्बोधक वाक्ये असलेल्या पाट्या लटकावलेल्या होत्या :--
* '' माणुसकी प्राप्त करून घ्यावयाची असेल तर धर्मातर करा. संघटना
_ करावयाची असेल तर धर्मातर करा.
* सामर्थ्य संपादन करावयाचे असेल तर धर्मातर करा.
* समता प्राप्त करून घ्यावयाची असेल तर धर्मातर करा.
* स्वातंत्र्य प्राप्त करून घ्यावयाचे असेल तर धर्मातर करा.
* संसार सुखाचा करावयाचा असेल तर धर्मातर करा
* जो धर्म तुमच्या माणुसकीला काही किंमत देत नाही त्या धर्मात तुम्ही
का राहता ?
* जो धर्म तुम्हाला देवळात जाऊ देत नाही त्या धर्मात तुम्ही का राहता ?
* जो धर्म तुम्हाला पाणी मिळू देत नाही त्या धर्मात तुम्ही का राहता?
* जो धर्म तुम्हाला शिक्षण घेऊ देत नाही त्या धमति तुम्ही का राहता ?
* जो धर्म तुमची पदोपदी मानहानी करतो त्या धर्मात तुम्ही का राहता ?
* जो धर्म तुमच्या नोकरीच्या आड येतो त्या धर्मात तुम्ही का राहता ?
* ज्या धर्मात माणसाशी माणुसकीने वागण्याची मनाई आहे. तो धर्म नसून
शिरजोरीची सजावट आहे |
* ज्या धर्मात भाणसाची माणुसकी ओळखणे अधर्म मानला जातो तो धर्म
नसून रोग आहे
* ज्या धर्मात अमंगल पशूचा स्पर्श झाला असताना चालतो पण माणसाचा
स्पर्श चालत नाही तो धर्म नसून वेडगळपणा आहे
* जो धर्म एका वर्गाने विद्या शिकू नये, धनसंचय करू नये, [शस्त्रधारण ] [करू ] __ नये, असे सांगतो तो धर्म नसून माणसाच्या जीवनाचे विडंबन [आहे. ]