३०-५-१९३६ ते १-६-१९३६ मुक्ती कोन पथे ? - Page 532

४८८ डॉ. बावासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

* जो धर्म अशिक्षितांना अशिक्षित रहा, निर्धनांना निर्धन रहा अशी शिकवण

देतो तो धर्म नसून ती शिक्षा आहे.

* वाचेने सर्वांभूती एक ईश्वर म्हणणारे आणि कृतीने माणसाला पशूतुल्य

लेखणारे लोक दांभिक आहेत. त्यांचा संग करू नका.

* मुंग्यांना साखर घालणारे आणि माणसांना पाण्यावाचून मारणारे लोक

दांभिक आहेत, त्यांचा संग करू नका."

आजवरी होतो तुझे सत्तेखाली !!

तोवरी केली विटंबना !!

व्यासपीठावर पाचशेवर मंडळी सहज बसू शकतील इतके ते विस्तृत होते. मंडपावर समतेचे झेंडे फडकत होते. सर्व श्रोतृसमुदायास भाषणे ऐकण्यास सापडावीत म्हणून मायक्रोफोन लावण्यात आले होते.

सुभेदार विश्राम सवादकर हे आपल्या समता सैनिक दलाच्या ५०० सैनिकांसह मंडपात व्यवस्था ठेवण्यास सज्ज होते. या दलाचा बँड व पुण्याच्या मिलीटरी पेन्शनरांचा बँड श्री. बाबुराव पवारांनी पुण्याहून परिषदेसाठी मुद्दाम आणला होता.

अधिवेशनाची वेळ सायंकाळी ७ ची होती. परंतु चार वाजल्यापासूनच प्रतिनिधींच्या व प्रेक्षकांच्या सुमारे ३०/३५ हजार लोकांच्या प्रचंड समुहाने मंडप गच्च भरून गेला होता. या परिषदेसाठी प्रत्येक जिल्ह्यातील महार पुढारी आपआपल्या जिल्ह्यातील लोकांसह हजर होते. सातारा जिल्ह्यातून मे. बळवंत सखाराम सावंत, पिराजी संभाजी खरात, आर. एन. नलावडे, गणेश हरी खरात, नाशिक जिल्ह्यातून श्री. भाऊराव गायकवाड, अमृतराव रणखांबे, श्री. दाणी, टी. एस काळे, पुंजाजी जाधव, कुलाबा जिल्ह्यातून बाबूराव भातणकर, गणपतबुवा जाधव, कुडवलकर, गोविंदराव वरघरकर, पुण्याहून मधाळे, सुभेदार घाटगे, भोसले, बाबूराव पवार, नानासाहेब वाघमारे, :नाथामहाराज (भंगी), शांताराम उपशाम, कर्नाटकातून बळवंतराव वराळे, ए. के. माळगे, मारुतीराव जोतीराव रावण, सोलापुराहून एन. टी. बंदसोडे, जिवाप्पा ऐदाळे, उद्धव धोंडो शिवशरण, बापुजी सर्वगौड, केरू रामचंद्र जाधव, माघाडे, हैद्राबाद संस्थानचे ग. नी. गायकवाड, कांबळे, पवार, अहमदनगरचे पी. जी. रोहम, सूर्यवंशी, शंकरराव साळवी, ठाणे जिल्ह्याचे शिवराम गोपाळ जाधव, बी. व्ही. दोंदे, भाऊ हरी पंडीत, दामोदर हरी वसईकर, बी. डी खंडे, पूर्वखानदेशातील पुढारी दौलतरावजी जाधव, त्रिंबक सेनू भालेराव, काळू विठू तायडे, लक्ष्मण पा. मेढे, नथुरावजी लोखंडे, जगन्नाथ खंडोजी बडगे, काळोजी तायडे, मोतीराम रावजी लोखंडे, भिकन गणूजी भैरूगे, शिवा रघुनाथ भास्कर, धर्माजी आबाजी वारभुवन,