३०-५-१९३६ ते १-६-१९३६ मुक्ती कोन पथे ? - Page 533

मुक्ती कोन पथे ? | ४८९

पश्चिम खानदेशातून पुंडलीक तुकाराम बोराळे, व्ही. टी. जाधव, महादेव गणेश ऐदाळे, सदाशीव लक्ष्मण गायकवाड, तुळजाराम भिकाजी तळभंडारे, लक्ष्मणराव गायकवाड, लक्ष्मणराव गजभिव, किसनराव वाघमारे, पाटोळे, मुंबईचे शिवतरकर मास्तर, साळवी बोरवरकर, वनमाळी, सोळंकी, वाळिंजकर, शंकरराव वडवलकर, जनाबाई मोरे, सोनुबाई सयाजी डावरे, भागिरथीबाई तांबे, अनुसयाबाइ व्हावळ, राजुबाई लक्ष्मणराव गायकवाड, मिसेस सवादकर, बी. एस. सावंत, पी. एल.लोखंडे, पोलादपूर सुभ्याचे बी. टी. तांबे, रत्नागिरीचे मुसाडकरबुवा, मोहिते मास्तर, राजाराम भोळे, अर्जूनराव साळवी, जी. ओ. सी. जंजीरा संस्थानचे महादेव खैरे, भोर संस्थानचे गायकवाड, भालेराव, सांगली संस्थानचे कांबळे, मोरे, जत संस्थानचे ऐदाळे, अकलकोटचे जाधव, जव्हार संस्थानचे पवार, गायकवाड, जमखिडीचे वाघचौरे, खैरमोडे, औंध संस्थानचे घाटगे, इंदूरहून ANAT नाईक, महूहून श्री. लोखंडे, करडक, निळे, प्रसिद्ध कीर्तनकार दिगंबर नागनाथ कांबळे, राघू सया डुबल, वसंतराव भातणकर, आर. एच. अडांगळे, जी. एस. दारोळे, दादा पगारे मास्तर, रोकडे, संभाजी तुकाराम गायकवाड, चांगदेव नारायण मोहिते, बाबाजी शिंदे, रामचंद्र वाघचौरे, सोनु सजनाजी संदीरकर वगैरे. मुंबई इलाख्यातील सर्व जिल्हयातून व संस्थानातून पुढारी मंडळी आपआपल्या जिल्ह्यातील लोकांसह परिषदेस हजर होती. शिवाय, परिषदेस देवदत्त नारायण टिळक, देवराव नाईक, डी. व्ही. प्रधान, डॉ. मिसेस चंपुताई प्रधान, दत्तोपंत देशपांडे, बाबूजी कवळी, असयीकर वकील, वेदक वकील, बी. कद्रेकर, एम. के. कर्णिक, अंडव्होकेट पाध्ये, पी. जी. काणेकर, बापूसाहेब सहस्त्रबुद्धे, अनंत हरी गद्रे, बॅ. समर्थ, भास्करराव जाधव, कमलाकान्त चित्रे, अनंतराव चित्रे, गोपीनाथ प्रधान, शांताराम पोतनीस, सुरेंद्रनाथ : टिपणीस वगैरे मंडळी व शिख समाजातील सरदार, सरदार इश्वरसिंग, दरबार सिंग, केहरसिंग, अमरसिंग वगैरे शिख पुढारी मंडळी आपल्या शिखबांधवासह हजर होती.

परिषदेस सायंकाळी ६-३० ला अध्यक्ष व्यंकटराव व डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे समता सैनिक दलाची गाड ऑफ ऑनरची सलामी घेत परिषदेच्या मंडपात आले. ते येत असताना त्यांच्या नावाचा प्रचंड जयघोष ते स्थानापन्न होईपर्यंत होत होता. सुरवातीस स्वागत पद्यगायन झाले व पुढे स्वागताध्यक्ष रेवजीबुवा उर्फ दादासाहेब डोळस यांचे भाषण झाले.

स्वागताध्यक्ष दादासाहेब डोळस यांचे भाषण झाल्यावर पुण्याचे पुढारी

श्री. राजाराम भोळे यांनी अध्यक्षांना अध्यक्षस्थान स्वीकारण्याची विनंती केली. त्यास नाशिकचे पुढारी श्री. भाऊराव गायकवाड यांनी व श्री. चांगदेव मोहिते आणि सुभेदार घाटगे यांनी अनुमोदन दिल्यावर अध्यक्ष स्थानापन्न झाले,