३०-५-१९३६ ते १-६-१९३६ मुक्ती कोन पथे ? - Page 534

४९० डॉ. वावासाहेव आंबेडकर लेखन आणि भाषणे

नंतर श्री. संभाजीराव गायकवाड यांनी त्यांना पुष्पहार अर्पण केले. नंतर ठिकठिकाणचे शुभसंदेश परिषदेचे चिटणीस श्री. दिवाकर पगारे यांनी वाचले. त्यात श्री. रावजी ठेंगे, रावसाहेब पापण्णा व सरदार केरसिंग यांचेकडून आलेले संदेश प्रमुख असून त्या सर्वात धमांतराचे घोषणेस पाठिबा व प्रोत्साहन देण्यात आले होते. .

नियोजित अध्यक्ष श्री. व्यंकटराव हे भाषण करण्यास उठताच टाळ्यांचा प्रचंड कडकडाट व डॉ. बाबासाहेब आंबेडकर व व्यंकटराव यांच्या नावाचा वातावरण दुमदुमून टाकणाऱ्या गगनभेदी गर्जनेत जयजयकार झाला. हा जयजयकार थांबल्यावर अध्यक्ष व्यंकटराव यांनी हिंदीत भाषण केले.

परिषदेमध्ये पास झालेले ठराव

ठराव १ ला-(अ) मुंबई इलाख्यातील महार जातीची ही परिषद पूर्ण विचारांती असे जाहीर करते को महार जातीला समाजात समता, स्वातंत्र्य मिळविण्यासाठी धर्मातर करणे हा एकच उपाय आहे. ही परिषद आमचे एकमेव परमपूज्य पुढारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना निश्चयपूर्वक असे जाहीर आश्वासन देते की महार समाज सामुदायिकरित्या धर्मांतर करण्यास तयार आहे. |

(ब) पूर्वतयारी' म्हणून महार जातीने यापुढे हिंदू देवतांची पूजा अर्चा करू नये. हिंदूंचे सण, व्रत वैकल्ये, उपोषणे, वगैरे पाळू नयेत व हिंदुंच्या कोणत्याही उत्सवात भाग घेऊ नये, तीर्थाटणे, वाऱ्या वगैरे करू नयेत, अशी या परिषदेची महार जातीला सूचना आहे.

हा ठराव नाशिकचे सुप्रसिद्ध पुढारी श्री. भाऊराव कृष्णराव गायकवाड यांनी मांडला तर या ठरावाला धारवाडचे श्री. एस. एस. वराळे यांनी अनुमोदन दिले आणि त्यांनी त्यानुसार आपले विचार प्रकट केले. या ठरावाला पाठिंबा दर्शविताना अहमदनगरचे श्री. पी. जे. रोहम, जनाबाई मोरे, कु. राजुबाई गायकवाड, सौ. सोनुबाई डावरे, कु भागिरथीबाई तांबे, कुलाब्याचे प्रमुख पुढारी श्री. विश्राम गंगाराम सवादकर, यांची भाषणे झाली

पहिल्या आठवड्यातील परिषदा

ता. ३० मे ते ता. २ जून १९३६ पर्यंत मुंबई येथील दादर-नायगाव भागात अस्पृश्य बांधवांच्या झालेल्या परिषदांनी बरीच मोठी खळबळ उडून गेली. मुंबई इलाखा महार परिषदेसाठी दादर येथे टोलेजंगी मंडप उभारला होता. या मंडपास कै. रमाबाई ऊफ आईसाहेब भीमराव आंबेडकर यांच्या स्मरणार्थ ' रमाबाई नगर ' असे नाव देण्यात आले होते. शिवाय ज्या प्रमुख शहरी अस्पृश्यांनी आपल्या स्वाभिमानाच्या, स्वावलंबनाच्या व समानतेच्या हक्कासाठी, गेली कित्येक वर्षे निकराचे लढे लढविले त्या ' महाड ' व ' नाशिक ' येथील