३०-५-१९३६ ते १-६-१९३६ मुक्ती कोन पथे ? - Page 545

मुक्ती कोन पथे ? ५०१

माणसाला दुसऱ्या माणसास आपला गुलाम करून ठेवता येत नाही. ज्या धर्मात व्यक्तीला प्राधान्य नाही तो धर्म मला मान्य नाही आणि हिंदू धर्मात व्यक्तीला प्राधान्य नसल्या कारणाने तो धर्म मला मान्य होवू शकत नाही. तसेच ज्या धर्मात एका वर्गाने विद्या शिकावी, दुसऱ्या वर्गाने शस्त्र धरावे, तिसऱ्याने व्यापार करावा व चौथ्याने नुसती सेवा करावी, असे आहे, तो धर्म मला मान्य नाही. विद्या दरेकाला हवी. शस्त्राची दरेकाला जरूरी आहे. पैसा सर्वाना पाहिजे. ही गोष्ट जो धर्म विसरतो व जो एकाला सज्ञान करण्याकरिता बाकिच्यांना अज्ञानात ठेवतो तो धर्म नसून लोकांना बौद्धिक गुलामगिरीत ठेवण्याचा कावा आहे. जो धर्म एकाच्या हाती शस्त्र देतो व दुसऱ्याला निःशस्त्र करतो तो धर्म नसून एकाला दुसऱ्याने पारतंत्र्यात ठेवण्याची शक्कल आहे. जो धर्म काहींना धनसंपादनाचा मार्ग मोकळा ठेवतो व बाकीच्यांना आपल्या जीविताकरिता दुसऱ्यावर अवलंबून राहण्याची अनुज्ञा देतो तो धर्म नसून स्वार्थपरायण आहे. fg धर्मातील चातुर्वर्ण्यं हे असे आहे. त्याविषयी माझे मत काय हे.मी स्पष्टपणे मांडले आहे. हा हिंदू धर्म तुम्हाला हिताचा आहे की काय “द्याचा तुम्ही विचार करा. व्यक्तीच्या आत्मोज्रतीला पोषक असे वातावरण उत्पन्न करणे ही धर्माची मूलभूत कल्पना आहे हे जर मान्य केले तर हिंदू धर्मात तुमची आत्मोन्नती कधीही होऊ शकणार नाही. व्यक्तीच्या विकासाला तीन गोष्टींची आवश्यकता आहे. सहानुभूती, समता आणि स्वातंत्र्य. हिंदू धर्मात या तिन्हीपैकी एकतरी बाब तुमच्याकरिता उपलब्ध आहे असे तुम्हाला म्हणता येईल काय ?

हिंदू धर्मात तुम्हाला सहानुभूती आहे काय ?

सहानुभूतीच्या दृष्टीने पाहिले तर सर्वत्र शून्यच आहे, असे म्हणावे लागेल. कोठेही तुम्ही गेलात तरी तुमच्याकडे आपुलकीच्या भावनेने कोणीही पाहणार नाही. याचा अनुभव तुम्हाला चांगलाच आहे. आपुलकीची भावना नाहीच नाही परंतु हिंदू लोकांकडून तुम्हाला परक्यापेक्षा परके लेखण्यात येते. एकाच गावात राहणारे स्पृश्य आणि अस्पृश्य यांचा परस्पर संबंध कसा असतो, हे जर पाहू गेले तर शेजारी शेजारी राहणारे दोघे भाऊ असे कोणालाही म्हणता येणार नाही. छावणी दिलेले हे दोन परस्परविरोधी सैन्याचे तळ आहेत, असेच म्हणावे लागेल. जितके मुसलमान लोक हिंदुंना जवळचे वाटतात, त्यांच्याशी जेवढा त्यांचा स्नेहभाव असतो त्याच्या शतांशाने देखील [तुमच्याशी ] हिंदुंचा नसतो. हिंदू मुसलमान हे लोकल बोर्डात, कायदे कौन्सिलात, व्यापारात एकमेकांना सहाय्यभूत होऊन वागतात. पण तुमच्याशी तसे सहानुभूतीने हिंदू लोकांनी वागल्याचे एखादे तरी उदाहरण दाखवून [देता ]