३०-५-१९३६ ते १-६-१९३६ मुक्ती कोन पथे ? - Page 548

५०४ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

म्हणून बढाई मिरवतात. विज्ञान आणि धर्म या दोन गोष्टी अगदी निरनिराळ्या आहेत. एखादी गोष्ट विज्ञानाचे तत्त्व आहे की धर्माची शिकवण आहे याचा विचार केला पाहिजे. समाजाच्या गळी सर्वांभूती एक ईश्‍वर हा विज्ञानाचा सिद्धांत आहे. धर्माच्या तत्त्वाचा वागणुकीशी संबंध असतो, विज्ञानाशी नसतो. सर्वांभूती एक ईश्‍वर ही धर्माची शिकवण नाही. हे विज्ञानाचे तत्त्व आहे, धर्माची शिकवण नव्हे. ही गोष्ट हिंदू लोक त्याप्रमाणे वागत नाहीत, हा माझ्या म्हणण्याचा पुरावाच आहे. उलटपक्षी हिंदू लोकांचा असा आग्रहच असेल की सर्वांभूती एक परमेश्‍वर हा विज्ञानाचा सिद्धांत नसून त्यांच्या धर्माचा पाया आहे आणि म्हणून आमचा धर्म श्रेष्ठ आहे. तर त्यांना एवढेच उत्तर पुरे आहे की, त्यांच्याइतके नीच लोक जगामध्ये दुसरे कोणीच नसतील ! मुखाने सर्वांभूती ईश्वर, असा जप करणाऱ्या आणि कृतीने भूतमात्राची विटंबना करणाऱ्या लोकांचा ' मुखमे राम बगल मे छुरी ' ' बोलणी महानुभावाची पण करणी कराबाची ' अशा दुष्ट लोकातच समावेश करावा लागेल. सर्वांभूती एक ईश्वर गानणारे आणि कृतीने माणसाला पशूलुल्य लेखणारे लोक दांभिक आहेत, त्यांचा संग करू नका ! मुंग्यांना साखर घालणारे द माणसांना पाण्यावाचून मारणारे लोक दांभिक आहेत त्यांचा संग करू नका ! त्यांच्या संगामुळे तुमच्यावर काय परिणाभ झाला आहे याची तुम्हाला कल्पना देखिल नाही. तुमची इज्जत नाहीशी झाली, तुमचा मानसन्मान नाहीसा झाला ! खरे म्हटले असता हिंदू समाजातच तुम्हाला ATA-

सन्मान नाही, हे म्हणणे वस्तुस्थितीच्या मानाने अपुरे पडते. तुम्हाला हिंदू लोकच हलके मानतात असे नव्हे, तर गुसलमान व खिस्ती लोक देखील तुम्हाला हलके लेखतात. खरे म्हटले असत्ता गुसलमानी धर्मात, खिस्ती धर्मात श्रेष्ठ- कनिष्ठ, उच्च-नीच असा भेदभाव जागृत करणारी शिकवण नाही. असे असताना देखिल हे लोक तुम्हाला कमी लेखतात. त्याचे कारण काय ? ह्याचे कारण एकच. हिंदू लोक तुम्हाला नीच लेखतात म्हणूनच तुम्हाला मुसलगान व खिस्ती लोक नीच लेखतात. अस्पृश्यांना जर आम्ही समान लेखले तर हिंदू लोक आपल्याला अस्पृश्यांच्या इतकेच खाली लेखतील या भीतीमुळे मुसलमान व खिस्ती लोक तुमच्याशी हिंदू प्रमाणेच अस्पृश्यता पाळतात. आम्ही हिंदू समाजात हीन गणलो गेलो आहोत, इतकेच नव्हे तर हिंदुंच्या असमानतेच्या वर्तणुकीमुळे आम्ही सर्व हिंदुस्थानदेशामध्ये सर्वापेक्षा हीन गणलो गेलो आहोत. ही अपमानकारक परिस्थिती टाळण्याकरिता, हा कलंक धुवून टाकण्याक रेता, नरदेहाचे चीज करण्याकरिता, जर कोणतः एखादा उपाय असेल तर तो एकच आहे व तो म्हणजे हिंदू धर्माचा व हिंदू समाजाचा त्याग करणे हाच

होय.