५-१९२४ समाजजीवनात निरपेक्ष कर्तव्य बुद्धीने झटले पाहिजे - Page 55

समाजजीवनात निरपेक्ष कर्तव्य बुद्धीने
झटले पाहिजे

बार्शी , जि. सोलापूर येथे भरलेल्या मुंबई प्रांतिक बहिष्कृत परिषदेत मे १९२४ मध्ये बॅरिस्टर आंबेडकर यांचे भाषण झाले. ते आपल्या भाषणात म्हणाले,

धन्य आहे की अस्पृश्यतेने आम्हास गुलाम म्हणून लेखले नाही. नाही तर किराण्या वस्तुप्रमाणे अथवा गुराढोराप्रमाणे आमचा बाजार झाला असता. अशा प्रकारच्या गुलामगिरीत आम्ही सापडलो नाही याबद्दल कोणी समाधान मानून घेऊ नये. कारण अशा प्रकारची आमची गुलामगिरी असती तर त्यातून आमची सुटका लवकर झाली असती. प्राचीन काळातील रोम, ग्रीस इत्यादी राष्ट्रात दास्यत्वाचा म्हणजे गुलामगिरीचा शिरस्ता असे. अनेक कारणांमुळे त्या देशातील लोकांना गुलाम बनण्याची पाळी येत असे व एकदा मनुष्य गुलामांच्या यादीत दाखल झाला म्हणजे जड वस्तुप्रमाणे त्याची स्थिती होऊन तो सर्व प्रजाजनांच्या हक्कास वंचीत होत असे. हिंदुस्थानातील अस्पृश्य लोक रोमन लोकांच्या गुलामाप्रमाणे जड वस्तुच्या स्थितीला पोचले नाहीत ह्या दृष्टीने पाहता हिंदुस्थानातील अस्पृश्यता रोमन व ग्रीक लोकातील गुलामगिरीपेक्षा बरी असे कोणी म्हणतील व एका दृष्टीने ते खरेही आहे. पण दुसऱ्या दृष्टीने पाहता अस्पृश्यता ही गुलामगिरीपेक्षा अत्यंत वाइट अशी स्थिती [आहे. ] गुलाम लोक गुलामगिरीतून मुक्त होऊन स्वतंत्र प्रजाजनांच्या स्थितीला जाऊन [पोचल्याची ] साक्ष सारा रोमचा इतिहास देत आहे. पण हिंदुस्थान देशाच्या इतिहासात अस्पृश्यांचा स्पृश्य झाल्याचा एकही दाखला देता येत [नाही. ] रोमन लोकातील गुलामगिरी ही कालिक स्थिती असे व त्यातून सुटका [होण्यास ] [अनेक ] [मार्ग ] [मोकळे ] असत. त्याच्या उलट अस्पृश्यता ही त्रिकालाबाधित अशी [स्थिती ] [आहे ] व त्यापासून सुटका होण्यास कोणताच [मार्ग ] [नाही. ] जन्मतः जो अस्पृश्य तो मरेपर्यंत अस्पृश्य असा करडा नियम [असल्यामुळे ] [शतकेच्याशतके ] [लोटली ] तरीपण अस्पृश्य समाजं अस्पृश्यच राहिला [आहे. ] याशिवाय इतर बाबीतही

ज्ञानप्रकाश : २४ मे १९२४ व ७ जून १९२४.