मुक्ती कोन पथे ? ५०७
आज्ञेप्रमाणे वांगले पाहिजे. स्मृतीत तशी आज्ञा नसेल तर महाजनांच्या पाऊलावर पाऊल ठेवून वागले पाहिजे. हिंदू धर्मात बुद्धीला, विचाराला प्राधान्य तर नाहीच नाही, पण वाव देखील नाही. हिंदुने कोणाची तरी गुलामगिरी केलीच पाहिजे ! वेदांची गुलामगिरी केली पाहिजे, स्मृतीची कास धरली पाहिजे, अगर महाजनांचे अनुकरण केले पाहिजे, विचारशक्तीचा त्याने मुळीच उपयोग करता कामा नये. जोपर्यंत तुम्ही हिंदू धर्मात आहात तोपर्यंत तुम्हाला विचारस्वातंत्र्य प्राप्त होऊ शकत नाही. यावर कोणी असे म्हणतील की हिंदू धर्माने तुमचेच मानसिक स्वातंत्र्य हिरावून घेतले असेच नव्हे तर हिंदू धर्माला प्रमाण मानणाऱ्या सर्व जातीचे मानसिकस्वातंत्र्य हिरावून घेतलेले आहे. हिंदू धर्मामुळे सर्वच बौद्धिक गुलामगिरीत सापडले आहेत हे खरे, पण त्यामुळे ते समदुःखी आहेत असे कोणी समजू नये. कारण या बौद्धिक गुलामगिरीचे दुष्परिणाम सर्वांना भोगावे लागत नाहीत. स्पृश्य वर्गाच्या ऐहिक सुखावर या बौद्धिक गुलामगिरीचा कोणत्याही प्रकारचा अनिष्ट परिणाम होऊ शकत नाही. ते जरी वेदांचे गुलाम झाले, स्मृतीचे दास असले, महाजनांचे गतानुगतिक बनले तरी हिंदू समाजाच्या व्यवहारात त्यांना वेदांनी, स्मृतींनी व महाजनांनी उच्चपद दिलेले आहे. दुसऱ्यावर हुकूमत गाजविण्याकरिता त्यांना अधिकार दिलेले आहेत. सारा हिंदू धर्म वरिष्ठ वर्गाच्या हिंदुंनी वरिष्ठ वर्गाच्या हिंदुंच्या संवर्धनाकरिता रचलेला आहे, ही गोष्ट अगदी निर्विवाद आहे. ज्याला ते धर्म म्हणतात त्या धर्मात तुम्हाला गुलामाची भूमिका दिलेली आहे. इतकेच नव्हे तर या गुलामगिरीतून तुमची सुटका होऊ नये, अशा प्रकारची व्यवस्थाही त्या धर्मात केलेली आहे. म्हणून हिंदू धर्माच्या ह्या बौद्धिक गुलामगिरीतून सुटका करून घेण्याची तुम्हाला जितकी जरूरी आहे तितकी हिंदुंना नाही. अशा रीतीने विचार केला असता, हा हिंदू धर्म तुम्हाला दोन्ही तऱ्हेने मारक झाला आहे. या धमनि तुमचे मानसिक स्वातंत्र्य हिरावून घेऊन तुम्हास गुलाम केले आहे व याच धर्माने तुम्हाला व्यवहारात गुलामगिरीच्या दशेत आणून टाकले आहे. तुम्हाला जर स्वातंत्र्य हवे असेल तर तुम्हाला धर्मातरच केले पाहिजे.
अस्पृश्यातील संघटना आणि धर्मातर
अस्पृश्यता निवारण्याची जी आज चळवळ चालू आहे त्या चळवळीवर अशी टीका करण्यात येते की, अस्पृश्य वर्गात ज्या निरनिराळ्या जातींचा समावेश झालेला आहे त्या जातीतही परस्परातील व्यवहारामध्ये जातीभेद पाळण्यात येतो, नव्हे अस्पृश्यता पाळण्यात येते. महार, मांग एकमेकांच्या हातचे खात नाहीत. दोघेही warren जातीला शिवत नाहीत व त्यांच्याशी