३०-५-१९३६ ते १-६-१९३६ मुक्ती कोन पथे ? - Page 557

मुक्ती कोन पथे ? ५१३

त्यांच्याबद्दल अत्यंत तिटकारा आहे. मला त्यांचा चांगला अनुभव आहे आणि या अर्धवट लोकांचा मला अगदी वीट आला आहे. ज्या लोकांना आपल्या जातीत राहावयाचे आहे, आपल्या जातीत मरावयाचे आहे, आपल्या जातीत लग्न करावयाचे आहे, त्या लोकांनी ' आपण जातीभेद मोडणार आहोत ' अशी खोटी वल्गना करावी व त्या वल्गनेवर अस्पृश्य लोकांनी विश्‍वास ठेवला नाही, म्हणून संतप्त व्हावे, ही गोष्ट मोठीच आश्चर्याची आहे. या लोकांच्या वल्गना ऐकल्या म्हणजे अमेरिकेतील निग्रो लोकांच्या सुटकेकरिता ज्या गोऱ्या अमेरिकन लोकांनी प्रयत्न केला, त्याची मला आठवण होते ! एकेकाळी अमेरिकेतील निग्नो लोकांची स्थिती हिंदुस्थानातील अस्पृश्य वर्गाप्रमाणेच होती. त्यांची गुलामगिरी कायद्याने प्रस्थापित केलेली होती, तुमची गुलामगिरी धर्माने प्रस्थापित केलेली आहे, एवढाच काय तो फरक आहे. या गुलामगिरीतून त्यांची सुटका करण्याकरिता अमेरिकेतील काही सुधारक प्रयत्न करीत होते. . पण हिंदू समाजसुधारकांची आणि निग्नोंची सुटका करणाऱ्या अमेरिकेतील गोऱ्या सुधारकांची तुलना करता येईल काय ? काळया RA लोकांची गुलामगिरीतून सुटका व्हावी म्हणून आपल्याच. रक्तमांसाच्या गोऱ्यांशी अमेरिकन सुधारणावाद्यांनी तुंबळ युध्द केले. त्यांना गुलामगिरीत ठेवावे असे म्हणणाऱ्या असंख्य गोऱ्या लोकांचे प्राण घेतले व आपल्यापैकी असंख्य लोकांच्या प्राणांची आहुती दिली. त्या प्रसंमाचे वर्णन इतिहासातून वाचले आणि आमच्या समाजसुधारकांचे चित्र डोळ्यापुढे ठेवले म्हणजे ' कहां राजा कहां पोतराजा ' असेच म्हणणे भाग पडते. सुधारक म्हणून म्हणविणाऱ्या हिंदुस्थानातील अस्पृश्यांच्या कैवाऱ्यास असे विचारणे प्राप्त आहे की, अमेरिकेतील गोऱ्या लोकांनी निग्रोंच्या सुटकेकरता जी आपआपसात यादवी केली तशी यादवी करण्यास तुम्ही सिध्द आहात का ? व सिध्द नसाल तर सुधारणेच्या व्यर्थ वल्गना करण्यात काय हशील आहे ? हिंदुंमधले फार मोठ्यातले मोठे अस्पृश्यांच्या उन्नतीकरता झटणारे म्हटले म्हणजे महात्मा गांधी ! त्यांची मजल किती लांब जाऊ शकते ? इंग्रज सरकार विरूध्द निःशस्त्र ` प्रतिकाराचा लढा लढविणारे महात्मा गांधी अस्पृश्य वर्गावर जुलूम करणाऱ्या हिंदुंचे मन देखील दुखवायला तयार नाहीत ! त्यांच्याविरूद्ध सत्याग्रह करावयाला तयार नाहीत ! इतकेच नव्हे तर त्यांच्याविरूध्द कायदेशीर इलाज करावयाला देखील तयार नाहीत ! या सुधारकांचा काय उपयोग आहे, मला कळत नाही.

खरे चुकते स्पृश्यांचेच

काही जण अस्पृश्यांच्या सभेत येवून मोठ्या तावातावाने स्पृश्यांना शिव्या देतील, काही जण अस्पृश्यांच्या सभेत येऊन मोठ्या आढ्यतेने अस्पृश्यांना सांगतील की, बाबांनो, तुम्ही स्वच्छ राहा, शिक्षण घ्या, तुमच्या पायावर