मुक्ती कोन पथे ? ५१५
कार्यभाग होणार नाही, रोटीव्यवहार व बेटीव्यवहार घडला तरच समानता प्राप्त होऊ शकेल. याचाच अर्थ असा की, चातुर्वर्ण्याचा बिमोड झाला पाहिजे व ब्राह्मणी धर्माचा विध्वंस झाला पाहिजे. ही गोष्ट शक्य आहे काय ? व ही जर शक्य नसेल तर हिंदू धर्मात राहून समतेच्या वागणुकीची अपेक्षा करणे शहाणपणाचे होईल काय ? व या प्रयत्नात तुम्हाला यश येईल काय ? त्या मानाने धर्मांतराचा मार्ग किती तरी सोपा आहे. हिंदू समाज मुसलमान समाजाला समतेने वागवितो. हिंदू समाज खिस्ती समाजाला समतेने वागवितो. अर्थात धर्मातराने सहजगत्या सामाजिक समता प्राप्त होऊ शकते. . हे जरी खरे आहे तर मग
धर्मातरासारख्या साध्या सोप्या मार्गाचा तुम्ही अवलंब का करू नये ? माझ्या मते धर्मातरांचा मार्ग जसा अस्पृश्य लोकांना तसाच हिंदुंनाही सुखाचा होणार
आहे. हिंदू धर्मात राहाल तोपर्यंत तुम्हाला त्यांच्याशी शिवाशिवीकरिता, पाण्याकरिता, रोटीकरिता, बेटीकरिता भांडण करावे लागेल व जोपर्यंत हे भांडण चालू राहिल तोपर्यंत तुमच्यात आणि त्यांच्यात बखेडा माजेल व तुम्ही एकमेकांचे वैरी होऊन राहाल. धर्मातर केले तर भांडणाचे सर्व मूळच नाहीसे होईल. तुम्हाला
त्यांच्या देवळावर हक्क सांगण्याचा काही अधिकार राहाणार नाही व जरूरीही राहणार नाही. सहभोजन करा, सहविवाह करा वगैरे सामाजिक हक्काकरिता भांडण्याचे काही कारण उरणार नाही आणि हे भांडण मिटले तर उभयतांमध्ये प्रेम वाढून सलोखा उत्पन्न होईल. आज मुसलमान व खिस्ती समाजांची व हिंदू समाजाची परस्पर स्थिती काय आहे, हे पाहा. तुमच्याप्रमाणे हिंदू लोक मुसलमानांना अगर खिस्ती लोकांना आपल्या देवळात घेत नाहीत. तुमच्या प्रमाणे त्यांच्याशी रोटीव्यवहार करीत नाहीत, बेटीव्यवहार करीत नाहीत. असे असताना त्यांच्यात आणि हिंदुमध्ये जो आज सलोखा आहे तो तुमच्यात आणि हिंदुत नाही. हा जो फरक आहे त्याचे मुख्य कारण हेच की तुम्ही हिंदू धर्मात राहिल्यामुळे हिंदू समाजाशी सामाजिक व धार्मिक हक्कांकरिता तुम्हाला भांडावे लागते. परंतु ते हिंदू धर्मातून बाहेर गेल्यामुळे त्यांना हिंदू लोकांशी धामिक व सामाजिक हक्कांकरिता लढा चालविण्याचे कारण पडत नाही. दुसरे असे की हिंदू समाजात त्यांना कोणत्याही प्रकारचे सामाजिक हक्क नसले, म्हणजे त्यांच्याशी रोटीव्यवहार होत नसला व बेटीव्यवहार होत नसला तरी हिंदू समाज त्यांना असमानतेने वागवित नाही. धर्मांतराने जर समता प्राप्त होऊ शकते,
ARRA जर हिंदू. आणि अस्पृश्य यांच्यामध्ये सलोखा उत्पन्न होऊ शकतो, तर
तो समतेचा साधा आणि सुखकर मार्ग अस्पृश्य लोकांनी का स्वीकारू नये ? अशारीतीने पाहिले असताना हा धर्मांतराचा मार्ग खऱ्या स्वातंत्र्यात नेणारा आहे व त्यापासून खरी समता प्राप्त होणार आहे. धर्मांतराचा मार्ग हा पळपुटेपणाचा मार्ग नाही. तो भेकडपणाचा मार्ग नाही, तो एक शहाणपणाचा मार्ग आहे. धर्मांतराच्या आड आणखी एक बाब उपस्थित करण्यात येते.