३०-५-१९३६ ते १-६-१९३६ मुक्ती कोन पथे ? - Page 565

मुक्ती कोन पथे ? ५२१

अटीवर दिलेले नाहीत, ते कधी ना कधी संपुष्टात येतील. इंग्रज सरकारने जो निवाडा दिला होता त्या निवाड्यात आपणाला दिलेल्या राजकीय हक्कांची कालमर्यादा वीस वर्षांची ठरविलेली होती. ' पुणे करारात तशा प्रकारची कालमर्यादा निश्‍चित केलेली नसली तरी त्यातील मुदत अमर्याद आहे, असे कोणालाही म्हणता येणार नाही. ज्यांचा राजकीय हक्कांवर भर आहे त्यांनी हे राजकीय हक्क गेल्यावर मग काय होईल, याचा विचार अवश्य करावा. ज्या दिवशीं हे राजकीय हकक जातील त्या दिवशी आपल्याला आपल्या सामाजिक सामर्थ्यावरच अवलंबून राहावे लागेल. ते सामर्थ्य आपल्या अंगी नाही, हे मी वर सांगितलेच आहे. ते सामर्थ्य धर्मातर केल्याशिवाय आपल्याला प्राप्त होऊ शकणार नाही, हेही मी वर सिद्ध करून दिले आहे. कोणाही माणसाने जवळचा विचार करून भागणार नाही. तात्पुरत्या लाभाला भाळून जाऊन शाश्‍वत हित कोणत्या गोष्टीत आहे याचा विचार न करणे हे अतीदुःखदायक होणार आहे. अशा परिस्थितीत कायमचा लाभ कोणत्या गोष्टीत साठविलेला आहे याचा विचार सर्वांनी अवश्य करावयास पाहिजे. माझ्या मते शाश्वत हिताच्या दृष्टीने पाहिले असताना धर्मांतराचा उपाय हाच खरा उपाय आहे. त्याकरिता राजकीय हक्कांची जरी आहुती देण्याचा प्रसंग आला तरी त्याला कोणीही भीक घालू नये. धर्मातराने राजकीय हक्कांस धोका नाही. परंतु धर्मातर केले असता आपल्या राजकीय हक्काला का धोका बसावा, हेच मला समजत नाही. तुमचे जे राजकीय हक्क आहेत ते तुम्ही कोठेही गेले असता तुमच्या बरोबर येतील, याविषयी मला कोणत्याही प्रकारची शंका वाटत नाही. तुम्ही मुसलमान झालात तर तुमचे हक्क मुसलमान म्हणून तुम्हाला मिळतील, तुम्ही खिस्ती झालात तर तुमचे हक्क खिस्ती म्हणून तुम्हाला मिळतील, शीख झालात तर तुमचे हक्क शीख म्हणून तुम्हाला मिळतील. राजकीय हक्क हे लोकसंख्येवर अवलंबून आहेत. ज्या समाजाची लोकसंख्या वाढेल त्या समाजाचे राजकीय हक्कही वाढतील. आम्ही हिंदू समाजातून निघून गेलो तर आमच्या पंधरा जागा राहिलेल्या हिंदुच्या वाट्यास जातील असा कोणीही आपला भ्रम करून घेऊ नये. आम्ही मुसलमान झालो तर आमच्या पंधरा जागा, मुसलमान लोकांनो ज्या हल्ली जागा प्राप्त झाल्या आहेत त्यांच्या भरीला पडतील. आम्ही खिस्ती झालो तर आमच्या जागा खिस्ती समाजाला ज्या जागा मिळाल्या आहेत त्यांच्या भरीला त्या जातील. एकूण आमचे राजकीय हक्क आम्ही जिकडे जाऊ तिकडे जातील. तेव्हा या बाबतीत भिण्याचे काहीच कारण नाही. उलटपक्षी आपण जर धर्मांतर केले नाही व हिंदू धर्मातच राहिलो तर आपले हक्क राहतील काय, याचा विचार तुम्ही अवश्य केला पाहिजे. समजा