५-१९२४ समाजजीवनात निरपेक्ष कर्तव्य बुद्धीने झटले पाहिजे - Page 57

समाजजीवनात निरपेक्ष कर्तव्य बुद्धीने झटले पाहिजे १५

अस्पृश्यतेच्या पायी अशी वागणूक झाली असल्यामुले हा कलंक धुवून जाईल याकडे आपल्यातील सर्व लोकांचे लक्ष लागून गेले आहे. यासाठी अनेक प्रकारचे उपाय सुचविलेले दिसतात. काही लोकांचे असे म्हणणे आहे की, अस्पृश्य लोकांनी देशांतर करावे. असे ऐकिवात आहे की, ज्या दिवशी निराश्रित सहाय्यकारी मंडळाची स्थापना झाली, त्या दिवशी एका वरिष्ठ वर्गातील गृहस्थाने अशी सूचना केली की, हे अस्पृश्य लोक ही आपली पीडा, दुसऱ्या कोण्या देशाला घेऊन का जात नाहीत ? अशाप्रकारचे तिरस्कारयुक्त उपदेश करणारे गृहस्थ वरच्या वर्गात आज फारसे नाहीत ही समाधानाची गोष्ट आहे. परंतु केवळ आपल्या लोकांच्या हिताच्यादृष्टीने जर आपण पाहिले तर या देशांतराच्या सूचनेत पुष्कळ हित साठविलेले आहे, असे म्हणण्यात हरकत नाही. चतकोर भाकरीच्या तुकड्यासाठी गावातील साऱ्या लहान-थोरांच्या लाथा खाण्यापेक्षा फिजी, इस्ट आफ्रिका, न्युगिनी वगैरे दैशात जाऊन नशीब काढणे केव्हाही हितावह होणार आहे. हिंदुस्थानातील लोकास परदेशात गेले असता तेथील प्रजाजनाप्रमाणे समसमान हक्क प्राप्त होत नाहीत, ही मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे. तरी पण माझी खात्री आहे की, हिंदी म्हणून परदेशात जो त्रास होईल तो हिंदू म्हणून आपल्या स्वदेशात आपल्याला जो त्रास होतो त्याच्यापेक्षा केव्हाही जास्त होणार नाही. इतकेच नव्हे तर आपल्या देशात हिंदू धर्माच्या बंधनामुळे द्रव्यार्जनाचे मार्ग बंद आहेत ते सर्वस्वी खुले होऊन आपल्यातील लोकांची आर्थिक स्थिती सुधारेल यात मुळीच शंका

नाही. |

परंतु सर्वच लोकांना देशांतर करणे शक्य होणार नाही, झाले तर फार थोड्यांनाच ते शक्य होणार आहे. तेव्हा या देशात राहूनच अस्पृश्यतेचे निर्मूलन करण्याचे मार्ग शोधून काढले पाहिजेत. तशा प्रकारचां दुसरा मार्ग म्हणजे धर्मातर. कोणत्याही धर्माकडे आपण जसे तात्त्विक तसे व्यावहारिकदृष्ट्याही

पाहिले पाहिजे. तात्तिवकदृष्ट्या हिंदू धर्म कोणत्याही धर्मास हार जाणार नाही, असे माझे मत आहे. नव्हे कोणत्याही धर्माहून तो श्रेष्ठच गणला जाईल. या हिंदुधर्मात ” सर्वाभूती एक आत्मा”. असे मूलतत्त्व आहे. या उदात्त तत्त्वाप्रमाणे जर समाजघटना झाली असती तर ज्याप्रमाणे दिवा घरच्यावर तेवढा उजेड करावा व WRT, अंधार पाडावा असे करीत नाही किंवा ज्याप्रमाणे वृक्ष जो त्याचा उच्छेद करतो अथवा जो त्यास पाणी घालतो, या उभयतास सारखीच सावली देतो किंवा पाणी ज्याप्रमाणे गाईची तृषा हेरून वाघाऱा विष होऊन मारून टाकीत नाही तशी हिंदुंची [समबुद्धी ] [असती ] [तर ] [| ] [परंतु ] हिंदू समाजाचे व्यावहारिक स्वरूप किती किळसवाणे [झाले ] [आहे ] [? ] [आचाराला ] व विचाराला कोठे मेळ आहे काय ? जे लोक [सर्वांभूती ] एक [आत्मा ] [आहे ] [असे ] कंठशोष करून सांगतात त्याच लोकांनी [मनुष्यासारख्या ] [मनुष्याला ] [अपवित्र ] [व ]