१-६-१९३६ आज साधुत्वाचा केवळ सांगाडा राहिला आहे - Page 570

९०

आज साधुत्त्वाचा केवळ सांगाडा राहिला आहे

' मुंबई इलाखा अस्पृश्य संत समाजाच्या परिषदेचे अधिवेशन ता. १ जून १९३६ रोजी, मुंबई इलाखा महार परिषदेकरिता खास उभारलेल्या भव्य मंडपात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली भरले होते. डॉ. बाबासाहेबांनी धर्मातराची घोषणा केल्यापासून अखिल अस्पृश्य वर्गातच नव्हे तर अखिल हिंदू समाजात मोठी खळबळ उडून गेली आहे. स्पृश्य हिंदू समाजाच्या जुलूमाखाली वर्षानुवर्षे खितपत पडलेल्या अस्पृश्य बांधवांना डॉ. आंबेडकरांनी धर्मांतराची केलेली घोषणा देववाणी वाटली असल्यास नवल नाही. या धर्मातराच्या घोषणेनंतर सर्व हिंदुस्थानभर अस्पृश्यांच्या सभा, परिषदा भरून त्यांनी डॉ. आंबेडकरांच्या घोषणेला पाठिंबा देणारे ठराव पास करून, आपली धर्मातराची जय्यत तयारी दाखविली. धर्मांतराला विरोधी वृत्ती दाखविणारे व दुसऱ्यांच्या | ओंजळीने पाणी पिऊन स्वार्थ साधणारे काही ' हरिजन ' वगळल्यास अस्पृश्य जनतेला धर्मांतराचे महत्त्व पटले आहे आणि त्यांनी आपल्या सक्रीय तयारीसाठी मुंबईस जशी अखिल मुंबई इलाख्यातील महार बांधवांनी परिषद भरवून डॉ. बाबासाहेबांच्या धर्मांतराच्या ठरावास सामुदायिकरीत्या पाठिंबा दिला, तसाच, मातंग बांधवांनीही दिला आणि त्याच धोरणानुसार मुंबई इलाख्यातील संत-महंत, साधु, वैरागी वगैरे लोकांनीही आपली परिषद वरील तारखेस भरविली होती.

_ या परिषदेच्या पूर्व तयारीसाठी साधु-संत मंडळींनी एक स्वागत मंडळ व कार्यकारी मंडळ स्थापून पुढीलप्रमाणे विनंतीपत्र प्रसिद्ध केले होते. “a परिषदेत आपल्या सर्व संत समाजातील, सर्व संत मंडळींनी धर्मांतराच्या ठरावाला पाठिंबा देऊन सदर ठरावाची अंमलबजावणी करण्याकरिता, आपले परमपूज्य व सन्मान्य पुढारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे ज्या दिवशी धर्मातर करावयास लावतील, त्याच दिवशी नक्की आपण सर्व लहान थोर संत मंडळींनीही त्यांचे बरोबर धर्मांतर करण्यास सिद्ध झाले पाहिजे. अशा प्रकारचा ठाम विचारविनिमय ठरवून आपल्या संत समाजाचे पुढील धोरण निश्चित केले जाणार आहे. त्याचप्रमाणे संत समाजाच्या हिताच्या सर्व बाबतींचा पूर्णपणे विचार होऊन पुढील कार्याची रूपरेषा आखण्यात येईल, वगैरे. ' ही परिषद यशस्वी करण्याकरिता स्वागताध्यक्ष महंत शंकरराव नारायणदास बर्वे, कर्पुरनाथ