१-६-१९३६ आज साधुत्वाचा केवळ सांगाडा राहिला आहे - Page 571

आज साधुत्त्वाचा. केवळ सांगाडा राहिला आहे ५२७

गोकुळनाथ, तारकानाथ विठ्ठलनाथ, वैद्य शंकरनाथ लक्ष्मणनाथ, हरिदास योगानंद, दशरथनाथ विठ्ठलनाथ, किसनदास शंकरदास महंत, रामनाथ कडकनाथ, योगिनाथ रघुनाथ, जगन्नाथ भडकनाथ, काशिनाथ तुळशीनाथ महंत, सोमनाथ दशरथनाथ, भक्तिदास वगैरे मंडळींनी बरीच जीवापाड मेहनत घेतली होती. कोणत्याही समाजावर बहुधा संत महंतांचाच अधिक पगडा बसलेला असतो. अशा परिस्थितीत ह्या हिंदू धर्मानुसार आजपर्यंत अस्पृश्य वर्गात वावरणाऱ्या संत महंतांनीच धर्मातराला प्रवृत्त व्हावे ही गोष्ट विशेष अभिनंदनीय आहे. असो.

परिषदेपूर्वी स्वागतपर पदे झाली. अध्यक्षस्थानी डॉ. बाबासाहेबांची निवड झाल्यावर चहुबाजुनी टाळ्यांचा कडकडाट झाला आणि त्यांच्या जयजयकाराने परिषदेमधील वातावरण दुमदुमून गेले. प्रथम स्वागताध्यक्ष महंत शंकरदास नारायणदास बर्वे यांनी सर्वाचे प्रेमाने स्वागत केले. त्यांनी नियोजित अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा FATT व तत्वज्ञानी असा उल्लेख करून धर्मातर

व संताचे कर्तव्य या मुद्यावर स्वागतपर भाषण केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अध्यक्षतेखाली भरलेल्या संत परिषदेमध्ये खालील ठराव सर्वानुमते पास करण्यात आले. |

ठराव १ ला .-- अखिल मुंबई इलाखा संत परिषद, मुंबई ही पूर्ण विचाराअंती असे जाहीर करते की, अखिल भारतीय अस्पृश्यांचे सर्वमान्य पुढारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या धर्मांतराच्या घोषणेला व मुंबई इलाखा महार परिषदेने पास केलेल्या धर्मांतराच्या ठरावाला पाठिंबा देत आहे.

सूचक :-- १. भक्तिदास विठ्ठलदास, २. गंगाराम रघुनाथ.

मांडणार :-- साळ्‌ंकेबुवा. अनुमोदन-हरिश्चंद्र ज्ञानदेव गायकवाड, कमालदास सेवादास.

ठराव २ रा .-- धार्मिक, शैक्षणिक, राजकीय वगैरे बाबतीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जे विचार व संदेश तोच संत समाजाचा धर्म व प्रचार-आचार यापुढे राहणार असून संत समाज त्या व्यतिरिक्त आपले कोणतेही धोरण ठेवणार नाही. अशी ही संत परिषद जाहीर करते

मांडणार :-- हरिदास तोरणे मास्तर. अनुमोदन-शिवराम गोपाळ जाधव, विठ्ठलनाथ तुळशीनाथ महंत. i i |

ठराव .3 रा .-- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्मातराची घोषणा केल्याप्रमाणे व सर्व अस्पृश्य समाजास धर्मांतर करण्याचे जाहीर केलेले असून हिंदू धर्माव्यतिरिक्त दुसरा धर्म स्वीकारण्याचे निश्‍चित केले आहे. आपणास या नव्या धर्माची शिकवण अस्पृश्य समाजाला देणे जरूर असल्यामुळे ही संत परिषद