५३० डॉ. बावासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
दिवाकर पगारे, रेवजीबुवा डोळस, संभाजी तुकाराम गायकवाड, अण्णासाहेब पोतनीस, चांगदेव मोहिते, शांताराम अनाजी उपशाम, अँ. कवळी, देवराव नाईक, अमृतराव रणखांबे, भाऊराव गायकवाड वगैरे प्रमुख मंडळी हजर होती. तसेच संत महंत मंडळीपैकी, पतितपावनदास बुवा, गणपतबुवा ऊफ मडकेबुवा, शिवराम गोपाळ जाधव, सेवकनाथ शुंगीनाथ, जगन्नाथ तारकनाथ, गणेशनाथ सिद्धनाथ, बुद्धिनाथ विदठलनाथ, भाविकनाथ भडकनाथ, चंचळनाथ भडकनाथ, भडकनाथ आलखनाथ, सेवकनाथ केशवनाथ, माधवदास देवकादास, मेनीनाथ तारकनाथ, किसनदास गोविंददास, गोपिनाथ गंगानाथ, अंकुशबुवा राघोजी फणसे, किसनदास शंकरदास, संभुनाथ गोविश्वनाथ, मंत्रीनाथ गरीबनाथ, चतुरनाथ चितगंगानाथ, आदिनाथ मेनीनाथ, दशरथनाथ विठ्ठलनाथ, रामनाथ कडकनाथ, बालकनाथ सेवकनाथ, श्रीपतीदास मुक्तिदास, यमाजीदास पांडवदास, अंबरदास लक्ष्मणदास, रमाजीनाथ आत्मारामनाथ, कमालदास सेवादास व गरीबनाथ तारकनाथ वगैरे मंडळी हजर होती.
संत परिषदेमधील वरील ठरावावर झालेली भाषणे फारच परिणामकारक व विचारविनिमय करण्यासारखी झाली. इतर समाज बांधवांप्रमाणे अस्पृश्य संत मंडळीचा डॉ. बाबासाहेबांच्या कार्याला किती आपुलकीचा पाठिंबा आहे याची प्रत्यक्ष खात्री पटल्याशिवाय राहाणार नाही. हिंदू धर्माच्या रूढीप्रमाणे आजपर्यंत या संत मंडळीनी जे आचार-विचार व्यवहारात रूढ केले होते त्यांना या परिषदेत शपथपूर्वक मूठमाती देण्यात आलीच. शिवाय ज्या हिंदू धर्मातील धर्मग्रंथांनी आजपर्यंत अस्पृश्य जनतेची दिशाभूल केली, ज्यांना विषमतेच्या व गुलामगिरीच्या वातावरणात खितपत ठेविले आणि स्वाभिमानाला पारखे केले त्या धर्मग्रंथांचे जाहीररीत्या या परिषदेमध्ये दहन करण्यात आले.
या परिषदेमध्ये याशिवाय आणखी एक मोठी महत्त्वाची गोष्ट घडून आली.
आज हजारो वर्षे हे साधुसंत हिंदू धर्माच्या रूढीच्या शिकवणीने वागत
होते. त्यांनी दाढ्यामिशा वाढवून ते जटाधारीही बनले होते. यांच्या गळ्यात माळांची पेटी लोंबकळत होती. अनेक सांप्रदायिपंथाचे संत हातात, कानात व गळ्यात गंडे, दोरे, माळा यांनी सुशोभित झालेले होते. परंतु डॉ. बाबासाहेबांनी हिंदू धर्माच्या विषमतेचे व अस्पृश्यांवरील अन्यायी वागणुकीची जेव्हा त्यांना धर्मांतराच्या घोषणेने जाणीव करून दिली तेव्हा यांचे डोळे खाडकन उघडले गेले. त्यांनी डॉ. बाबासाहेबांच्या घोषणेनुसार वागण्याचा मनाच्या निश्चयाने निर्धार केला आणि या परिषदेमध्ये हजारो वर्षे मनावरील घडलेल्या संस्काराने स्वीकारलेल्या साधुसंतांच्या अलंकाराचा त्याग केला. परिषदेच्या भव्य मंडपात तयार केलेल्या अग्निकुंडात शेकडो साधुसंतांनी आपल्या दाढ्या, मिशा, जटा व उपकरणे आणि संतमहंतगिरीची सर्व निशाणी अग्निनारायणाला अर्पण करून