आज साधुत्त्वाचा केवळ सांगाडा राहिला आहे ५३१
आपल्या धर्मात्राच्या निश्चयाचा निर्णय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या देखत प्रत्यक्ष कृतीने जाहीर केला. या साधुसंतांच्या निश्चयी बाण्याचे आणि त्यांनी आपले दाखविलेले मनोधैर्यं स्पृश्यवर्गीय साधुसंतांनाच काय पण इतर जनांनाही उदाहरणीय झाले आहे.
संत समाजाच्या या अधिवेशनाचा इतर अस्पृश्य समाजावर बराच परिणाम झाला आहे. दाढी, मिशा व जटा अग्निला अर्पण करून मुक्त झालेल्या संतांना, अस्पृश्य समाजात धर्मातरासंबंधी प्रचार कार्य करण्यासाठी किंवा ज्या ज्या कार्यामुळे समाजहित साधले जाईल असे कार्य दिले जाईल आणि अशा प्रकारची समाजसेवा करण्याचे कित्येक साधुसंतांनी कबूल केले आहे. देवदेवतांच्या भजन पूजनात व्यर्थ कालाचा व्यय करण्यापेक्षा जनसेवा निःस्वार्थ बुद्धीने करणे हीच खरीखुरी ईश्वरसेवा ठरणार आहे. एकंदरीत हे संत परिषदेचे कार्य विशेष यशस्वी तर झालेच, परंतु हजारो वर्षे ज्या रूढीयुक्त धर्माच्या नावाखाली हे संत नांदत होते त्यांचा दांभिकपणा त्यांना कळून येताच ते त्या ढोंगी धर्माचा त्याग केवळ डॉ. बाबासाहेबांच्या धर्मांतराच्या घोषणेने करण्यास तयार झाले आणि त्याप्रमाणे त्यांनी प्रत्यक्ष कृती केली हे सर्व अस्पृश्य संत समाजाला भूषणावह आहे. हां सर्व दाढी, जटा अग्निला अर्पण करण्याचा समारंभ संपल्यावर संत परिषदेचे अधिवेशन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयजयकारात संपविण्यात आले. “* १
१ जनता : ४ जुले १९३६.