FT शकी
कायदे मंडळावर पक्षाचा लायक ..
उमेदवारच निवडून आणा |
दि. १ जून १९३६ रोजी डॉ. बाबासाहेब आबेडकर यांचे राजकीय परिषदेपुंढे
भाषण झाले. ते आपल्या भाषणात म्हणाले
मी कालच धर्मातरासंबंधी भाषण करताना सामाजिक सुधारणा आधी की राजकीय सुधारणा आधी या विषयाचा बराच ऊहापोह केलेला आहे. . मनुष्यमात्राच्या आणि समाजाच्या प्रगतीला अनेक साधनांचा उपयोग करावा लागतो, . अमुक . एक गोष्ट आधी की अमुक एक मागाहून हा वाद शुष्क आहे. . अस्पृश्यांना धर्मांतराची जितकी आवश्यकता आहे तितकीच राजकारणाची आवश्यंक्रता आहे असे मी म्हणू शकेन. ज्याप्रमाणे धर्मातरासंबंधी आपले मत काय आहे, हे. जसे काल आपण अजमावून पाहिले तसे राजकारणासंबंधी आपले मत अजमावून पाहणे अत्यंत अवश्य आहे. . . आपण एके.ठिकाणी बसून राजकीय विषयावर चर्चा करावी. असे मला बरेच दिवसांपासून वाटत होते, परंतु तशाप्रकारची संधी. आजपर्यंत . प्राप्त झाली नव्हती. ती आज प्राप्त झाली याबद्दल मला..मोठे समाधान. वाटते. राजकारणाचा विषय हा काही सोपा विषय नाही. ..-तरी तुम्हा सर्वाना - हा विषय समजावा म्हणून मी आपणाला माझे विचार सोप्या भाषेत सांगण्याचा
Wa करणार आहे.
आपल्यापैकी जे कोशी जनता पत्र किंवा इतर वृत्तपत्रे वाचीत असतील त्यांना माहीत असेलच की पुढच्या सालच्या एप्रिल महिन्याच्या पहिल्या तारखेस हिंदुस्थान देशात नवीन सुधारणा येणार आहेत. या सुधारणासंबंधाने आपले धोरण कोणत्या प्रकारचे असावे व त्या सुधारणांचा उपयोग करून घेण्याकरिता आपणास कोणत्या प्रकारची संघटना केली पाहिजे, हे ठरविणे आवश्यक आहे.
या राजकीय सुधारणासंबंधी हिंदुस्थानातील लोकांचे काय मत असेल ते असो. या राज्यघटनेने हिंदुस्थान देशाची स्थिती बरी किंवा वाईट होणार हे पाहण्याचे आपणास प्रयोजन नाही. या राजकीय सुधारणा ज्या अंमलात यावयाच्या आहेत त्या केवळ अपुऱ्या असल्यामुळे त्या फेटाळून लावल्या पाहिजेत, अशाप्रकारची घोषणा काँग्रेस व इतर पक्ष करीत आहेत. ज्या लोकांकडून या सुधारणा राबवून घेऊ नयेत असे सांगण्यात येते त्यांच्याशी मला कर्तव्य नाही. प्रचलित राज्यव्यवस्थेपेक्षा या नवीन राजकीय सुधारणा देशाला वाईट आहेत, असे काही लोकांचे म्हणणे आहे. या मतासंबंधी मला इतकेच सांगावयाचे आहे की या नवीन
जनता : ४ जुले १९३६