१-६-१९३६ कायदे मंडळावर पक्षाचा लायक उमेदवारच निवडून आणा - Page 580

५३६ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

स्थापण्यात यावे व या मध्यवर्ती मंडळातर्फे सर्व जिल्ह्यातील प्रतिनिधींची निवड करण्यात येईल. ज्या कोणा उमेदवारास निवडणुकीला उभे राहावयाचे असेल त्याने आपल्या उमेदवारीचा अर्ज स्थानिक कमिट्यांकडे करावा व तो अर्ज त्यांनी शिफारसीसह मध्यवर्ती मंडळाकडे (सेंट्रल बोर्ड) आल्यावर त्या अर्जाचा विचार करून कोणीतरी एक उमेदवार मुक्रर केला जाईल. ही योजना सफलित व्हावयाची असेल तर तुमच्या संघटनेशिवाय आणि सहकार्याशिवाय काहीच होणे शक्य नाही. तुम्ही जर असा निश्चय केला की आमच्या बोर्डाने जो उमेदवार नेमून दिला आहे त्यालाच आम्ही मते देऊ तर आपल्याला ज्या पंधरा जागा मिळाल्या आहेत त्यापेक्षाही जास्त उमेदवार आपण निवडू शकू, मध्यवर्ती मंडळ ज्या उमेदवाराला निवडून देईल त्या उमेदवाराने आपल्या पक्षाच्या सर्व अटी पाळल्या पाहिजेत. या अटी कोणत्या असाव्यात त्या मी ठरविल्या आहेत. त्या मी मागाहून जाहीर करीन

आपल्याला राजकारणामध्ये अत्यंत महत्त्वाचा डाव खेळता येईल. दिसायला जागा पंधरा असल्या तरीपण जर आपण एकसूत्राने वागलो तर माझी खात्री आहे “की निवडणुकीच्यावेळी आपल्याला पंधराऐवजी पंचेचाळीस सभासद सहज निवडून आणत्ता येतील. इतकी संधी तुम्हाला सध्या प्राप्त झाली आहे

जी राजकीय: सत्ता तुम्हाला प्राप्त झालेली आहे त्याची कल्पना जरी. तुम्हाला ` नसली तरी वरिष्ठ वर्ग: ती जाणून आहे आणि म्हणून ते तुमच्या दाढीला हात लावण्यास कमी करणार. नाहीत.: त्यात आपले हित पाहणारे कोण व आपले ` हितशत्रू कोण याचा विचार करून जर आपण आपली मते दिली तर वरिष्ठ वर्गाचे काही लोक जे आपल्याकरिता झटतात त्यांना निवडणुकीत आपल्याला Aaa करता येईल. ` अशा रीतीने आपला गट मोठा होऊ शकेल. SERTA अनेक ` जातींचा. समावेश होतो. अस्पृश्य समाजात महार: जात: ही वडील बंधुप्रमाणे आहे. म्हणून सर्व जातींशी त्यांनी बंधुभावाने;: आफुलकीने;--समतेने वागले पाहिजे. त्यांच्याशी सहकार्य करण्याचे आपण औदार्य दाखविले पाहिजे. सर्वच जागा तुम्हीच बळकावून बसू नका. . तुमच्या स्वार्थाकरिता तरी तुम्ही इतरांना य़ा पंधरा जागात भागीदार केले पाहिजे. ही शिस्त पाळण्यास तुम्ही तयार आहात का ?. तुम्ही जर तय़ार असाल तरच मी राजकारणात पडणार आहे. तुम्ही शिस्त पाळणार नसाल तर मला राजकारणाची काही हौस नाही, हे मला आपणास स्पष्टपणे सांगणे भाग आहे

term., N

ros n EEE wore ws

ee Ch WR i ee ® ® ७